मराठी मालिकाविश्वात सध्या ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेत जयंतची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता मेघन जाधव(Meghan Jadhav) प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत आहे. मात्र, पडद्यावर दाखवला जाणारा जयंत आणि खऱ्या आयुष्यातील मेघन यामध्ये प्रचंड फरक असल्याचं त्याचा मोठा भाऊ मंदार जाधव (Mandar Jadhav) याने सांगितलं आहे.
गणेशोत्सवानिमित्त Mandar Jadhav आणि Meghan Jadhav यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत या दोन्ही भावांनी उत्सवाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर मेघनच्या अभिनयाबद्दल मंदारने खास प्रतिक्रिया दिली.
मुलाखतीदरम्यान Mandar Jadhav म्हणाला, “लक्ष्मी निवासमध्ये मेघन जयंतची भूमिका अप्रतिमपणे साकारतोय. पण त्याचं कौतुक करावं असं कारण म्हणजे खऱ्या आयुष्यात तो अजिबात जयंतसारखा नाही. पडद्यावर तो जितका कठोर किंवा जान्हवीशी उद्धट वागतो, प्रत्यक्ष आयुष्यात तो तितकाच शांत, संयमी आणि हुशार मुलगा आहे.”
Mandar Jadhav ने पुढे भावाबद्दल बोलताना सांगितलं की, “तो खूप कमाल अभिनेता आहे. आपल्या स्वभावाच्या पूर्ण विरुद्ध असलेली व्यक्तिरेखा तो इतक्या सहजतेने साकारतोय, हेच त्याचं मोठं यश आहे. यामुळेच जयंत ही भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे.”
फक्त Mandar Jadhav च नाही तर त्याची पत्नी मितीका जाधवनेही Meghan Jadhav चं कौतुक केलं. तिनेही म्हटलं की, “मेघन जयंतसारखा अजिबात नाहीये. तो एक उत्तम कलाकार आहे.” मुलाखतीत गंमतीने मंदार म्हणाला की, “आमच्या संपूर्ण कुटुंबात कधी कोणी झुरळ खाल्लं नव्हतं, पण मेघनने ते केलं.”
हे पण वाचा.. “गुडबाय गणू…” म्हणत Raqesh Bapat ने केले बाप्पाचे विसर्जन; एक्स पत्नी रिद्धी डोगराचीही उपस्थिती
मेघनच्या आईनेही आपल्या मुलाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “खऱ्या आयुष्यात तर तो आपल्या बायकोवर कधी आवाजही चढवणार नाही.” कुटुंबाकडून मिळालेलं हे प्रोत्साहन आणि प्रेम पाहून मेघनने स्वतः स्पष्ट केलं की, “लोकांना या मुलाखतीमधून कळेल की मी तसा नाहीये. झुरळ खाणं तर दूरची गोष्ट, मी आजवर कधी झुरळ मारलेलंही नाही.”
सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतून Meghan Jadhav चर्चेत असला, तरी त्यामागे कुटुंबाचं मिळणारं पाठबळ, कौतुक आणि विश्वास हे तितकंच महत्त्वाचं आहे. Mandar Jadhav ने दिलेली ही प्रतिक्रिया प्रेक्षकांसाठी नक्कीच खास ठरली आहे, कारण भावंडांमधील नात्याचा हा सुंदर भावनिक पैलू त्यांच्या नात्यातील जिव्हाळ्याची जाणीव करून देतो.
हे पण वाचा.. ‘लाखात एक आमचा दादा’ फेम Mrunmayee Gondhalekar ला मिळाला दुहेरी आनंद; तुळजामुळे दोनदा साजरा केला गणेशोत्सव









