ADVERTISEMENT

मालेगाव प्रकरणावर अभिनेत्री रुचिरा जाधव चा संताप; म्हणाली..

malegaon incident ruchira jadhav reaction : मालेगावमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर अभिनेत्री रुचिरा जाधव हिने तीव्र संताप व्यक्त करत समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रहार केला. “या मुलीला न्याय न मिळाल्यास आपण पूर्णपणे नापास आहोत,” असे तिचे स्पष्ट म्हणणे.
malegaon incident ruchira jadhav reaction

malegaon incident ruchira jadhav reaction : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. डोंगराळे गावातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. शवविच्छेदन अहवालात या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच डोक्यात प्राणघातक वार झाल्याचे नमूद आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अगदी सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणावर मराठी अभिनेत्री Ruchira Jadhav हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपला रोष व्यक्त केला. घडलेल्या घटनेची माहिती पाहताना आणि वाचताना मन सुन्न झाल्याचे सांगत ती म्हणाली की, “मालेगावमध्ये जे घडलं आहे ते शब्दांत मावणार नाही इतकं भयंकर आहे. ही मुलगी—केवळ चार वर्षांची! अशा चिमुकलीसोबत कोणी एवढी क्रूरता कशी करू शकतं, हा प्रश्नच आहे.”

तिने पुढे समाजातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत सांगितले की, लोक काही दिवस या घटनेवर बोलतील, हळहळ व्यक्त करतील, पण काही कालांतराने सगळं पूर्ववत होईल. “आपण आपल्या आपल्या जगण्यात व्यस्त होणार, आणि या मुलीचा विषय पुन्हा मागे पडणार. पण जोपर्यंत मूळ कारण शोधून त्यावर निर्णायक कृती होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत,” असे Ruchira Jadhav म्हणाली.

तिने समाजातील स्त्रियांना नेहमीच कपड्यांवरून, वागणुकीवरून दोष दिला जातो, याबद्दलही कठोर शब्दात भूमिका मांडली. “या चिमुकलीने कोणते वाईट कपडे घातले होते? तिच्याकडे बोट कसं दाखवणार? आता कोणता बहाणा करणार?” असा संतप्त सवाल तिने उपस्थित केला.

अखेरीस, तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर या मुलीला न्याय मिळाला नाही, तर समाज म्हणून आपण पूर्णपणे अपयशी ठरू. आणि मी एक स्त्री म्हणून आज आवाज उठवला नाही, तर मला स्वतःची लाज वाटेल.”

हे पण वाचा.. सायलीसमोर उघडणार नवं रहस्य! प्रतिमा महिपत येणार आमने-सामने रंगणार ड्रामा 

मालेगावमधील या प्रकरणाने समाजव्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि कलाकारांसह सर्वच स्तरांतून योग्य न्याय मिळावा, यासाठी कडक कारवाईची मागणी होत आहे.

हे पण वाचा.. माझ्याकडून चूक… प्रसादाच्या शिऱ्यात पडणार मिठाचा खडा? ‘Veen Doghatli Hi Tutena’ मालिकेत समर–स्वानंदीच्या संसारात नवा कलह!”

malegaon incident ruchira jadhav reaction