महिंद्राने आपली लोकप्रिय SUV mahindra xuv 3xo आता ऑस्ट्रेलियात लॉन्च केली असून तिची किंमत भारताच्या तुलनेत थेट ४ लाखांनी कमी ठेवली आहे. मात्र या किंमतीतील कपातीत एक मोठा ट्विस्ट दडलेला आहे. ऑस्ट्रेलियन बाजारात काही फीचर्स आणि इंजिन पर्याय कापण्यात आले आहेत, तरीही XUV 3XO तिथे सर्वात स्वस्त महिंद्रा SUV ठरली आहे.
Table of Contents
महिंद्रा ही भारतीय SUV सेगमेंटमधील अग्रगण्य कंपनी मानली जाते. महिंद्राच्या Scorpio, XUV700, Bolero, Thar आणि Thar Roxx सारख्या गाड्यांनी भारतीय बाजारपेठेत जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. याच यशस्वी गाड्यांच्या रांगेत mahindra xuv 3xo देखील एक महत्त्वाची SUV आहे. ही SUV आपल्या जबरदस्त फीचर्स, आकर्षक लुक्स आणि spacious केबिनमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरते. सध्या या गाडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महिंद्राने XUV 3XO चे दर थेट ४ लाख रुपयांनी कमी केले आहेत. पण यात एक महत्वाचा ट्विस्ट दडलेला आहे.
mahindra xuv 3xo झाली ४ लाखांनी स्वस्त; पण फक्त ऑस्ट्रेलियात!
महिंद्राने नुकतीच XUV 3XO ऑस्ट्रेलियन बाजारात लॉन्च केली आहे. तिथे ही गाडी सर्वात स्वस्त महिंद्रा SUV ठरणार आहे. याआधी महिंद्राने ऑस्ट्रेलियात XUV700, Scorpio N आणि S11 4X4 Pikup या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. आता त्यात XUV 3XO ची भर पडली आहे.
ऑस्ट्रेलियात XUV 3XO फक्त दोन व्हेरिएंट्समध्ये येणार आहे – AX5 L आणि AX7 L. तिथे या SUV ची सुरुवातीची किंमत आहे अवघी AUD 23,490 म्हणजेच सुमारे ₹13.18 लाख. तुलनात्मकदृष्ट्या भारतात याच SUV ची किंमत ₹17.18 लाखांपर्यंत जाते. त्यामुळे भारतीय बाजाराच्या तुलनेत ही SUV ऑस्ट्रेलियात जवळपास ४ लाख रुपयांनी स्वस्त आहे. मात्र यात एक मोठा फरक म्हणजे ऑस्ट्रेलियन मॉडेलमध्ये Stealth Black रंग मिळणार नाही.
mahindra xuv 3xo चे इंजिन व फीचर्स
भारतात महिंद्रा XUV 3XO मध्ये दोन टर्बो पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन मिळतो. यात 1.2-लिटर MPFi टर्बो पेट्रोल (110bhp, 200Nm), 1.2-लिटर TGDi टर्बो पेट्रोल (129bhp, 230Nm) आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन (115bhp, 300Nm) हे पर्याय आहेत. पण ऑस्ट्रेलियन मॉडेलमध्ये फक्त 1.2-लिटर MPFi पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे. डिझेल इंजिन तिथे उपलब्ध नसेल. हे इंजिन 110bhp पॉवर आणि 200Nm टॉर्क निर्माण करतं. या इंजिनसोबत 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळणार आहे.
हे पण वाचा..New Honda City चा स्पोर्टी अवतार लवकरच लॉन्च होणार; होंडाचा खास टीझर चर्चेत
mahindra xuv 3xo ची फीचर्स यादी तितकीच दमदार
ऑस्ट्रेलियात XUV 3XO मध्ये भारतासारखेच फीचर्स दिले जाणार आहेत. यामध्ये पॅनोरमिक सनरूफ, ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, लेव्हल 2 ADAS टेक्नोलॉजी, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि बरेच काही मिळतं.
AX5L व्हेरिएंटमध्ये 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, रूफ रेल्स, रियर स्पॉयलर, अॅटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि वायपर, कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट, इलेक्ट्रिक फोल्डेबल ORVMs, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम यांसारख्या सुविधा आहेत.
तसेच, AX7L हा टॉप व्हेरिएंट प्रीमियम फीचर्सने परिपूर्ण आहे. यात ब्लॅक लेदर सीट्स, डॅशबोर्ड आणि डोअर ट्रिम्सवर सॉफ्ट टच लेदर, Skyroof, Harman Kardon चं प्रीमियम साउंड सिस्टिम, 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, फ्रंट पार्किंग असिस्ट, 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, LED फॉग लाइट्स, कुल्ड ग्लोव्ह बॉक्स, 65W फास्ट चार्जिंग यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत.
किंमतीत मोठा फरक, पण ट्विस्ट कायम
ऑस्ट्रेलियात XUV 3XO च्या AX5L व्हेरिएंटची किंमत आहे $23,490 (₹13.15 लाख) आणि AX7L ची किंमत $26,490 (₹14.83 लाख). ही किंमत सध्या इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत आहे, जी 1 सप्टेंबरनंतर वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर AX5L ची किंमत $23,990 (₹13.43 लाख) आणि AX7L ची किंमत $26,990 (₹15.11 लाख) होईल.
भारताच्या तुलनेत, XUV 3XO च्या AX5L व्हेरिएंटची किंमत ₹13.94 लाख असून AX7L चं मूल्य ₹15.79 लाख आहे (Ex-Showroom). त्यामुळे ऑस्ट्रेलियात ही SUV भारतापेक्षा स्वस्त असली तरी काही फीचर्स कमी करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे डिझेल इंजिनचा पर्याय आणि काही रंग उपलब्ध नाहीत.
Mahindra XUV 3XO ची जागतिक स्पर्धा
ऑस्ट्रेलियन बाजारात mahindra xuv 3xo ची थेट टक्कर Mazda CX-3, Hyundai Venue, Kia Stonic यांसारख्या SUV शी होणार आहे. स्पेस, फीचर्स आणि किमतीचा विचार करता mahindra xuv 3xo ऑस्ट्रेलियातही ग्राहकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
mahindra xuv 3xo भारतासह आता आंतरराष्ट्रीय बाजारातही आपला ठसा उमटवत आहे. किंमतीत ४ लाख रुपयांचा फरक आणि जागतिक दर्जाचे फीचर्स यामुळे ही SUV आगामी काळात लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र भारतात याची पूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स मिळतात, तर ऑस्ट्रेलियन बाजारासाठी काही गोष्टी कापण्यात आल्या आहेत. तरीही Mahindra XUV 3XO चा परवडणारा दर आणि दमदार लुक्स ग्राहकांना नक्कीच भुरळ घालतील.