mahasangam kamali tarini trp zee marathi : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर दाखविण्यात आलेल्या ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या लोकप्रिय मालिकांच्या महासंगम भागाने प्रेक्षकांची मनं अक्षरशः जिंकून घेतली आहेत. गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या या विशेष एपिसोडमध्ये दोन्ही मालिकांच्या कथानकाला एकत्र गुंफत थरार, भावना आणि नाट्यमय घडामोडींचा उत्कृष्ट मिलाफ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यामुळे या भागाची चर्चा सोशल मीडियापासून प्रेक्षकांत मोठ्या प्रमाणात रंगताना दिसली.
कॅम्पसमध्ये घडणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्यासाठी कमळी आणि तारिणी एकत्र येतात आणि कथेला एक हटके वळण मिळतं. त्याचदरम्यान कामिनी आणि युवराज यांच्याकडून कौशिकी खांडेकरचा जीव घेण्याचा प्रयत्न होतो. फुलांच्या हारात लपवलेला स्फोटक क्षणीच ओळखणारी कमळी आणि तिच्या मदतीला तत्पर धावून येणारी तारिणी—या दोघींच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळतो. या प्रसंगातील टेन्शन, बॅक-टू-बॅक ट्विस्ट आणि कलाकारांची परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक भारावून गेले.
महासंगम भागाला मिळालेला प्रतिसाद मात्र अपेक्षेपलीकडे ठरला. आठवड्यातील ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत रात्री ९ ते १० च्या स्लॉटमध्ये ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ने स्पर्धक वाहिन्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. झी मराठी’ने अनेक दिवसांनी मिळवलेला हा स्लॉट लीडरचा मान विशेष ठरला. दोन्ही मालिकांना मिळालेलं ४.१ रेटिंग हे या भागाच्या लोकप्रियतेचं प्रमुख उदाहरण ठरलं आहे.
या यशानंतर ‘झी मराठी’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “महासंगमचा महाविजय” असं म्हणत प्रेक्षकांचे आभार मानले. चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत कलाकार आणि निर्मात्यांचं कौतुक केलं. “स्टोरी भन्नाट होती”, “महासंगममध्ये भन्नाट थ्रिलिंग फील आला”, “दोन्ही टीमचं हार्दिक अभिनंदन” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटल्या.
हे पण वाचा.. ग्लोव्ह्ज घालून जेवली श्रुती मराठे! गौरवचा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसले
‘Kamali’ आणि ‘Tarini’ या दोन्ही मालिकांचा उंचावलेला टीआरपी, रोमहर्षक कथा आणि ‘झी मराठी’चा खास सादरीकरण यामुळे हा महासंगम प्रेक्षकांच्या मनात खास ठसा उमटवून गेला आहे.
हे पण वाचा.. मुक्ता बर्वे पुन्हा करणार धमाल; ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर अर्जुन–सायलीसोबत रंगणार भन्नाट भाईगिरी









