maharashtrachi hasyajatra prajakta mali sutradharitva : सहजसुंदर व्यक्तिमत्व, मोहक स्मितहास्य आणि आपल्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री Prajakta Mali नेहमीच चर्चेत असते. चित्रपट असो वा मालिका, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर नेहमीच गारुड केलं आहे. पण तिच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो “महाराष्ट्राची हास्यजत्रा”.
आज या शोचं सूत्रसंचालन प्राजक्ताची ओळख बनलं आहे. तिच्या “वाह दादा वाह” या डायलॉगपासून ते तिच्या सहजसुंदर अदा, प्रेक्षकांना नेहमीच भावल्या. मात्र, या शोसाठी तिनं सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता, हे फार कमी लोकांना माहीत आहे.
अलीकडेच “MHJ Unplugged” या खास गप्पांच्या कार्यक्रमात प्राजक्ताने याबाबत खुलासा केला. सूत्रसंचालनाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी ठरवलं होतं की रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करणार नाही. फक्त एक सत्र अनुभव म्हणून करेन आणि थांबेन. पण दुसऱ्या सत्रासाठी मला प्रसाद ओक म्हणाले – ‘तू हे नक्की कर. नाहीतर लोकांना वाटेल तुला काढलं आहे.’ त्यांच्या या वाक्यामुळे मी होकार दिला.”
याच निर्णयानंतर प्राजक्ताचा प्रवास वेगळ्याच वळणावर गेला. पुढील अनेक सत्रं तिच्याशिवाय शोची कल्पनाही करणं कठीण झालं. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात फक्त हाच शो सुरू राहिला आणि त्यामुळे सूत्रसंचालनाकडे तिचा बघण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलला.
प्राजक्ता सांगते, “लोक मला ‘तुझं काम छान आहे’ किंवा ‘तू सुंदर दिसतेस’ यापेक्षा ‘तुझ्या कार्यक्रमामुळे आम्हाला हसू येतं, आम्हाला आनंद मिळतो’ अशा प्रतिक्रिया देऊ लागले. तेव्हा मला जाणवलं की हे खरं पुण्यकर्म आहे. आता या शोला गालबोट लागायला नको.”
हे पण वाचा.. अवधूत गुप्तेने नवरात्रीत घरी आणली MG Cyberster; किंमत ऐकून चाहते थक्क!
जरी कधी कधी तिला विविधतेचा अभाव जाणवत असला, तरी प्रेक्षकांच्या हसऱ्या चेहऱ्यातून मिळणाऱ्या समाधानामुळे ती हा प्रवास सुरू ठेवतेय. प्राजक्ताच्या मते, “मीसुद्धा एक कलाकार आहे आणि सतत इतरांना परफॉर्म करताना पाहणं थोडं कठीण असतं. पण हा शो लोकांच्या आयुष्यात सकारात्मकता आणतो, त्यामुळे त्याला सोडणं अन्याय ठरेल.”
आज Prajakta Mali आणि “महाराष्ट्राची हास्यजत्रा” यांची ओळख एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे. तिच्या होकारामागचं हे सत्य ऐकून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
हे पण वाचा.. प्रियाची आई आहे भुरटी चोर, अर्जुन महिपतला सापडले प्रियाचे खरे आई बाबा Tharala Tar Mag 27 September







