Isha Keskar Exit Laxmichya Pawalani: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत नुकतंच मोठं वळण पाहायला मिळालं आणि त्या वळणाचं केंद्रबिंदू ठरली अभिनेत्री Isha Keskar. मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा कला अचानक कथा सोडून जाते आणि ईशाच्या जागी नवी नायिका म्हणून नक्षत्रा मेढेकर हिची एंट्री होते. या बदलामुळे प्रेक्षकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं. खरंच ईशा मालिकेतून बाहेर पडली का? अचानक असा निर्णय का घेतला? या सगळ्याचा खुलासा आता स्वतः ईशा केसकरने एका मुलाखतीत केला असून तिचा निर्णय समजताच चाहत्यांच्या भावना आणखीनच ढवळून निघाल्या आहेत.
Isha Keskar ईशा सांगते की, सलग दोन वर्षे ती कोणताही ब्रेक न घेता काम करत होती. जून महिन्यात तिच्या डोळ्याला गंभीर फोड आला, तरीही शूटिंग सुरूच ठेवण्याची तिची धडपड सुरू होती. मात्र दुखापत वाढत गेल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने विश्रांतीचा सल्ला दिला. डोळ्याची स्थिती आणखीन बिघडली तर छोट्या शस्त्रक्रियेची वेळ येऊ शकते, तसेच काही दिवस सूर्यप्रकाशही पाहता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे ती म्हणाली. त्यामुळे वेळ न दवडता तिने सप्टेंबरमध्येच टीमला सांगितलं की, ती मालिका सोडणार आहे.
याआधीही काही महिन्यांपूर्वी ती चिकनगुनिया आणि अन्नातून विषबाधा झाल्याने शूटिंगपासून दूर राहिली होती. त्या काळात मालिकेच्या टीमने तिला मोठा आधार दिला, पण पुन्हा प्रकृतीची समस्या उद्भवल्यावर सुट्टी मागणं तिला योग्य वाटलं नाही. तिच्या अनुपस्थितीचा परिणाम थेट कथानकावर होईल, हे लक्षात घेऊन तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
Isha Keskar ईशा म्हणते, “जीवतोड मेहनत करून आपण कमावतो, पण त्या पैशांचा उपभोगच घेता आला नाही तर त्याला अर्थ काय? म्हणूनच या वेळी शरीराला विश्रांती द्यायचं ठरवलं.”
सध्या ती पूर्ण विश्रांती घेत असून व्यायाम, आरोग्य आणि स्वतःकडे लक्ष देण्याला प्राधान्य देत आहे. प्रेक्षकांबद्दल बोलताना ती म्हणते, “मी पूर्ण बरी झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे.”

‘जय मल्हार’मधील बानूची भूमिका असो किंवा ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील शनाया – Isha Keskar नेहमीच प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे. त्यामुळे तिच्या पुनरागमनाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अभिनेत्री पूजा बिरारीच येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या सेटवर पार पडलं केळवण Pooja Birari Kelvan








