laxmichya paulani serial final episode update : स्टार प्रवाहवरील Laxmichya Paulani ही मालिका गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची जोडी या मालिकेत प्रथमच पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. मात्र काही आठवड्यांपूर्वी आजारपणामुळे ईशाने मालिका सोडली आणि तिच्या व्यक्तिरेखेचा अचानक अंत दाखवण्यात आला. या बदलानेच चाहते दुखावले होते, त्यातच आता मालिका अवघ्या काही दिवसांत संपणार असल्याची घोषणा समोर आली आहे.
चॅनेलकडून Laxmichya Paulani च्या अंतिम भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून त्यात संपूर्ण कथेचा क्लायमॅक्स उलगडताना दिसतो. कलाच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू अपघातामुळे झाल्याचं दाखवलं असलं, तरी प्रत्यक्षात हा अपघात राहुलने घडवून आणल्याचं आता कथानकात उघड होणार आहे. याचबरोबर रोहिणीने चांदेकर कुटुंबीयांना विषारी केक देऊन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही पुढे येतं. रोहिणीला वाटतं सगळे मृत झाले आणि प्रॉपर्टीवर तिचा हक्क होणार. पण अद्वैतने आधीच सावधगिरी घेतल्याने कुटुंबातील एकाही व्यक्तीला इजा पोहोचत नाही. शेवटी अद्वैत रोहिणीसमोर तिचे सर्व गैरप्रकार उघड करतो आणि कबुलीनंतर तिला पोलिस ताब्यात घेतले जाते. याच ठिकाणी मालिकेचा शेवट होणार असल्याचं चॅनेलने जाहीर केलं आहे.
१२ डिसेंबरला प्रसारित होणारा हा अंतिम भाग जाहीर होताच प्रेक्षकांकडून नाराजीचे सूर उमटू लागले. अनेकांनी सोशल मीडियावर मालिका अचानक संपवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कथेला योग्य शेवट मिळालाच नाही”, “कला-अद्वैतची लव्हस्टोरी दाखवलीच नाही”, “ईशाला परत आणलं असतं तर चांगलं झालं असतं”, “१५ एपिसोडसाठी नवी नायिका घेण्याची काय गरज होती?” अशा असंख्य प्रतिक्रिया प्रोमोखाली दिसून आल्या.
Laxmichya Paulani मालिकेत ईशा केसकर, अक्षर कोठारी, नक्षत्रा मेढेकर, किशोरी अंबिये, दीपाली पानसरे, अद्वैत कडणे आणि सानिका बनारसवाले यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. उत्कृष्ट कलाकार, दमदार कथा आणि भावनिक ट्विस्ट यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. मात्र आता अचानक पडदा पडत असल्याने चाहत्यांना हा निर्णय अजिबात रुचलेला नाही.
हे पण वाचा.. थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अंदाज, बिकिनीत दिसली बोल्ड आणि ग्लॅमरस
अंतिम भागात उलगडणारे ट्विस्ट आणि कथा कशी गुंडाळली जाते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असले तरी मालिकेचा इतक्या लवकर शेवट होणं त्यांना अद्यापही खटकत आहे.
हे पण वाचा.. लग्नानंतर तेजस्विनी लोणारी लंडनमध्ये एन्जॉय करतेय हनिमून; नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल









