lapandav serial chetan vadnere rupali bhosle bhumika : मनोरंजनविश्वात नवीन मालिकांचा ओघ सुरूच आहे. प्रेक्षकांना दररोज काहीतरी वेगळं पाहायला मिळावं, यासाठी वाहिन्या सातत्याने नवीन प्रयोग करताना दिसतात. अशाच प्रयोगाचा भाग म्हणून स्टार प्रवाहवर १५ सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत चेतन वडनेरे आणि रुपाली भोसले या दोन कलाकारांच्या भूमिका विशेष चर्चेत आहेत.
प्रोमो आल्यापासूनच मालिकेविषयी कुतूहल निर्माण झालं आहे. या मालिकेत रुपाली भोसले ‘सरकार’ हे पात्र साकारणार आहे. प्रोमो पाहता हे पात्र काहीसं नकारात्मक छटांसह रंगवलं गेलं आहे. पण रुपाली भोसलेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की सरकार आणि तिची आधीची गाजलेली ‘संजना’ ही व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी आहे. “सरकारमध्ये अनेक भावना दडलेल्या आहेत. ती संजनासारखी अजिबात नाही. मालिकेच्या प्रवासात प्रेक्षकांना हे हळूहळू समजेल,” असं रुपाली म्हणाली.
याच मालिकेत चेतन वडनेरे ‘कान्हा’ची भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की कान्हा हा खलनायक ठरणार का? मात्र चेतनने या शंकेचं स्पष्टीकरण दिलं. “कान्हाच्या स्वभावाच्या विविध बाजू पाहायला मिळतील. कधीकधी त्याचं वागणं नकारात्मक वाटू शकतं, कारण तो परिस्थितीनुसार निर्णय घेतो. त्याच्या कृती नेहमी आदर्श नसतील, पण मनाने तो चांगलाच आहे,” असं त्याने स्पष्ट केलं.
हे पण वाचा.. पहिल प्रेम आणि कॉलेज काळातील ब्रेकअपबद्दल मनमोकळं बोलताना हृता दुर्गुळे म्हणाली”आईला सगळं कळलं होतं”
‘लपंडाव’मध्ये रुपाली भोसलेसोबत अभिनेत्री कृतिका देवही झळकणार आहे. ती ‘सखी’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, या तिघांच्या भूमिकांभोवती कथानक फिरताना दिसेल. मालिकेत एकामागोमाग एक येणारे ट्विस्ट आणि पात्रांचे परस्पर संबंध यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
दररोजच्या मनोरंजनात नवीन वळणं आणि आश्चर्यकारक घडामोडी पाहण्याची सवय असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी ‘लपंडाव’ ही मालिका नक्कीच वेगळी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.
हे पण वाचा.. अमृता धोंगडे आणि सोनाली पाटीलचा ‘ठुमक ठुमक…’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल









