ADVERTISEMENT

हार्दिक जोशी ने बायको अक्षया देवधर च्या ‘लक्ष्मी निवास’ यशाबद्दल व्यक्त केली खास भावना म्हणाला..

lakshminivas serial akshaya deodhar hardik joshi reaction 300 episodes : हार्दिक जोशी यांनी पत्नी अक्षया देवधर च्या लक्ष्मी निवास मालिकेच्या ३०० एपिसोड्सच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिच्या ‘भावना’ या भूमिकेचं कौतुक केलं. मेहनत, समर्पण आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे मालिका पुढेही मोठ्या यशाचा टप्पा गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
lakshminivas serial akshaya deodhar hardik joshi reaction 300 episodes

lakshminivas serial akshaya deodhar hardik joshi reaction 300 episodes :  मराठीवरील लोकप्रिय ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. या निमित्ताने संपूर्ण टीम एकत्र जमून छोटेखानी सेलिब्रेशन केलं. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि पत्नी अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी मालिकेबद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. दाम्पत्याची ही मुलाखत चाहत्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

या यशानिमित्त बोलताना हार्दिक जोशी यांनी पत्नीच्या कामाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, ‘लक्ष्मी निवास’ ही एक तासाची महामालिका असून तिचं शूटिंग किती मेहनतीचं असतं हे त्यांनी जवळून पाहिलं आहे. एक तासाचा भाग प्रेक्षकांना सहज दिसतो, पण त्यामागे कलाकार आणि तांत्रिक टीमचे अखंड कष्ट लपलेले असतात. त्यामुळे ३०० भागांची वाटचाल ही खूप मोठी उपलब्धी असल्याचं ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी मालिकेचे ६०० किंवा १५०० पेक्षा अधिक भाग होतील, असा आशावाद व्यक्त केला.

पत्नी अक्षया देवधर साकारत असलेल्या ‘भावना’ या भूमिकेबद्दल बोलताना हार्दिक ने विशेष आनंद व्यक्त केला. “अक्षयाने मालिकेत काम करावं, ही माझी इच्छा होती. ती पुन्हा झी मराठीवर आली हे माझ्यासाठीही मोठं समाधान आहे,” असं ते म्हणाले. त्यांना वाटतं की ‘भावना’ हे पात्र घराघरात आवडतंय आणि तेच मालिकेच्या यशाचं खरं कारण आहे. प्रेक्षकांनी या पात्राशी जोडलेलं नातं पाहून त्यांना अभिमान वाटतो, असं हार्दिक ने सांगितलं.

झी मराठीने अक्षयाला नेहमीच साथ दिली असून, कलाकारांच्या पाठिशी उभं राहणं ही या वाहिनीची परंपरा असल्याचं हार्दिक यांनी गौरवपूर्ण शब्दांत नमूद केलं. मालिकेतील पात्रांना जेव्हा प्रेक्षक स्वतःचा भाग समजतात, तेव्हा ती मालिका खऱ्या अर्थाने लोकप्रिय होते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा.. रेणुका शहाणे” यांचा स्पष्ट अनुभव; दैनंदिन मालिकांपासून दूर राहण्यामागचं खरं कारण त्यांनी उघड केलं

हार्दिक आणि अक्षया यांची ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादा–पाठकबाई ही जोडी प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. आता ‘लक्ष्मी निवास’मधील अक्षयाच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा प्रेक्षक त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत आहेतहार्दिक जोशी च्या मनापासून व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया मालिकेच्या यशात आणखी उत्साह भरतात.

हे पण वाचा.. पती पत्नी और पंगा ची धमाकेदार ग्रँड फिनाले; या कलाकार जोडप्याने पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

lakshminivas serial akshaya deodhar hardik joshi reaction 300 episodes