lakshmi niwas shrikant jivant reentry : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Lakshmi Niwas सध्या एका मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. आतापर्यंत मालिकेत श्रीकांतच्या अपघातप्रकरणी सिद्धूला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि कोर्टाने त्याला शिक्षा सुनावल्याचं प्रेक्षकांनी पाहिलं. या घटनेमुळे भावना आणि सिद्धूचं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं. मात्र, आता कथानकात असा धक्का बसणार आहे, ज्याची कुणीच अपेक्षा केली नव्हती.
श्रीकांतचा अपघात नेमका कसा झाला, याबाबत भावनाच्या मनात सुरुवातीपासूनच शंका होती. सिद्धू निर्दोष असल्याची तिला ठाम खात्री आहे. त्यामुळे सिद्धूला या प्रकरणातून बाहेर कसं काढायचं, खरे पुरावे कुठे शोधायचे, याचा ती सतत विचार करत असते. हळूहळू हेही स्पष्ट होतं की हा अपघात अपघात नसून रवीने रचलेला कट आहे. सत्य समोर येण्याआधीच कथेत आणखी एक मोठा स्फोट होणार आहे.
Lakshmi Niwas मालिकेत श्रीकांत पुन्हा एकदा जिवंत असल्याचं समोर येणार आहे. ज्याला सगळे मृत समजत होते, तो अचानक भावनाच्या आयुष्यात परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. या रिएन्ट्रीमुळे भावनाचं भावविश्व ढवळून निघणार आहे. एकीकडे सिद्धूने वडिलकीच्या भूमिकेतून तिला आधार दिला आहे, तर दुसरीकडे श्रीकांतचा पुन्हा प्रवेश झाल्याने भावना कोणता निर्णय घेणार, हा मोठा प्रश्न आहे. सिद्धू आनंदी वडील म्हणून स्वीकारला जाणार की श्रीकांत पुन्हा त्या जागेवर दावा सांगणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
या प्रोमोवर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रीकांत खरंच मेला नव्हता का? तो जिवंत असेल तर इतके दिवस कुठे होता? आणि आता तो नेमकं काय साध्य करू पाहतोय? अशा चर्चा जोरात सुरू आहेत.
याचबरोबर Lakshmi Niwas मध्ये इतर नात्यांमध्येही मोठे बदल दिसणार आहेत. जान्हवीमुळे विश्वा आणि जयंत यांच्यात थेट संघर्ष उफाळून येणार आहे. जान्हवी जिवंत असेल तर तिला पुन्हा मिळवण्यासाठी जयंत कोणत्या थराला जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विश्वाचं आक्रमक रूप आणि जयंतची हट्टाग्रही भूमिका कथेला आणखी वेग देणार आहे.
लक्ष्मीच्या आयुष्यातही शांततेला धक्का बसणार आहे. लक्ष्मी आणि वीणाने सुरू केलेल्या घरघंटी व्यवसायात एका व्यक्तीकडून भेसळ होणार असून त्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. आनंदाने सुरू असलेल्या लक्ष्मीच्या आयुष्याला आता संघर्षाचं नवं वळण मिळणार आहे.
हे पण वाचा.. कोण होतीस तू, काय झालीस तू! फेम अभिनेत्री रेवती लेले लवकरच लग्नबंधनात
एकूणच Lakshmi Niwas मालिकेत पुढील भागांमध्ये भावना, संघर्ष आणि नात्यांची परीक्षा पाहणारे प्रसंग पाहायला मिळणार असून, प्रेक्षकांसाठी येणारे दिवस नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहेत.
हे पण वाचा.. भर मांडवात रोमँटिक क्षण; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची खास पोस्ट – “तू, मी आणि आयुष्यभर…”







