lakshmi niwas mad identity revelation : लक्ष्मी निवास(Lakshmi Niwas) मालिकेत गेल्या काही भागांपासून रहस्यमय घटनांनी वेधलेल्या वातावरणात आता आणखी एक मोठा टप्पा उलगडताना दिसत आहे. वेंकीला श्रीकांत इनामदार यांच्या अपघातप्रकरणी अटक झाल्यापासून मालिकेची दिशा संपूर्ण बदलली. प्रत्यक्षात हा अपघात वेगळ्याच व्यक्तीने घडवून आणला असतानाही वेंकीवर संशय ठेवला गेला. त्याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी भावना धडपड करत असून, तिच्या लग्नावेळी वेंकी नेमका कुठे होता याचं उत्तर मिळवणं हा या केसचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
भावना चिंतेत असतानाच त्यांच्या मदतीला जान्हवीचा जवळचा मित्र विश्वा पुढे येतो. त्याला त्या दिवसाच्या सगळ्या घडामोडी माहित असतात, कारण तो स्वतः लग्नमंडपात उपस्थित होता. जान्हवीशी असलेलं त्याचं नातं अतिशय मनापासूनचं; पण तिच्या आयुष्यात जयंत आल्याने विश्वाने आपल्या भावना अंतरंगात दडवून ठेवल्या. जान्हवी आणि जयंतचं लग्न जरी झालं तरी नात्यातील काळोखी बाजू लवकरच तिच्यासमोर आली. जयंतच्या विकृत वागण्यामुळे जान्हवीने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिने ओळख बदलून देशमुख कुटुंबात आश्रय घेतला.
या सर्व गोंधळाच्या मुळाशी ‘मॅड’ नावाचा रहस्यमय व्यक्ती कोण, याचा शोध जयंत मागील काही भागांपासून घेत आहे. जान्हवी त्याला याबद्दल काहीच सांगत नाही, त्यामुळे तिच्या आयुष्यातील सगळ्या अडचणींसाठी तो ‘मॅड’लाच दोषी ठरवत आहे. याच गोंधळाचा शेवट आता कोर्टात होणार असून विश्वा दिलेली साक्ष संपूर्ण चित्र बदलून टाकते.
कोर्टात विश्वा म्हणतो की जान्हवी त्याला प्रेमाने ‘मॅड’ म्हणायची. हे वाक्य ऐकताच जयंतचा संताप अक्षरशः फुटतो. त्याच्या चेहऱ्यावरचं भावविश्व पाहून पुढे काय घडेल याची उत्सुकता अधिक वाढली आहे. प्रेक्षकांच्या कमेंट्समधूनही पुढील भागाबद्दल अनेक अंदाज व्यक्त होत आहेत.
हे पण वाचा.. सासू–सुनांची खास सहल! शिवानी रांगोळे सासूबाई मृणाल कुलकर्णीसोबत गेली बालीला
२५ नोव्हेंबरचा खास भाग ‘लक्ष्मी निवास’ चे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत, कारण त्या भागात जयंतसमोरचं मोठं सत्य उघड होणार आहे. विश्वाचं नावच ‘मॅड’ म्हणून समोर आल्यानंतर जयंत कोणतं टोकाचं पाऊल उचलेल, हा पुढील भागातील मोठा थरार असणार आहे. मालिकेतील हा निर्णायक क्षण नक्कीच प्रेक्षकांसाठी जबरदस्त ट्विस्ट घेऊन येणार आहे.
हे पण वाचा.. लक्ष्मी निवास फेम कलाकारांचा ‘जिवलग जीवाचा’ वर धमाकेदार डान्स; संतोषमामावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स







