lakshmi nivas kalyani jadhav bold look party : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ने अलीकडेच ३०० भागांचा टप्पा गाठला आणि या मोठ्या यशानिमित्ताने टीमने खास सेलिब्रेशनचे आयोजन केले. मालिकेतील सर्व कलाकार एकत्र येऊन हा आनंद साजरा करत असताना या पार्टीत एका अभिनेत्रीचा लूक विशेष चर्चेत आला आणि तो म्हणजे भूमिका निभावणारी कल्याणी जाधव (Kalyani Jadhav).
मालिकेत गाडेपाटील घराण्याची वहिनी म्हणून दिसणारी निलांबरी म्हणजेच कल्याणी जाधव नेहमीच भरजरी साडी, दागिने आणि पारंपारिक पेहरावात दिसते. मालिकेतील व्यक्तिरेखेनुसार तिचा लूक सौम्य, पारंपरिक आणि घराणेशाही दाखवणारा असतो. मात्र खऱ्या आयुष्यात कल्याणी जाधव यांचा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे, हे या पार्टीत पुन्हा एकदा सिद्ध झालं.
३०० भागांच्या सेलिब्रेशनला कल्याणी जाधव लाल रंगाच्या बोल्ड बॉडीकॉन वनपीसमध्ये पोहोचताच सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे वेधले गेले. तिचा आत्मविश्वास, वेस्टर्न आउटफिट आणि स्टाईलची झलक पाहून चाहते अक्षरश: थक्क झाले. मालिकेतून ओळख मिळवलेली ही अभिनेत्री सोशल मीडियावरसुद्धा तिच्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते आणि या पार्टीतील तिचा ग्लॅमरस अवतार त्याचाच प्रत्यय देणारा होता.
यावेळी तिने मालिकेतील अधिराज गाडेपाटीलसोबत रेड कार्पेटवर वॉक केला आणि नंतर सोलो पोझ देत फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेतले. तिचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. चाहत्यांपासून ते सहकलाकारांपर्यंत अनेकांनी कल्याणी जाधव च्या या लूकचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, मालिकेच्या कथानकातही सध्या रंगत वाढली आहे. बैंकी जेलमध्ये असून त्याला सोडवण्यासाठी भावना कोर्टात झगडताना दिसतेय. दुसरीकडे जान्हवीला विश्वाचं तिच्याबद्दलचं खरं प्रेम जाणवू लागलं आहे. मालिकेतल्या या घडामोडी आणि कलाकारांच्या ऑफ-स्क्रीन क्षणांमुळे ‘लक्ष्मी निवास’ सातत्याने चर्चेत राहात आहे.
हे पण वाचा.. सात जन्मांची साथ! मेघन जाधव आणि अनुष्का पिंपूटकर यांनी बांधली लग्नगाठ; थाटामाटात पार पडला सोहळा
कल्याणी जाधव चा हा पार्टी लूक मात्र नक्कीच चाहत्यांसाठी सरप्राईज ठरला असून तिच्या ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन व्यक्तिमत्त्वातील हा विरोधाभास सर्वांनाच भावला आहे.
हे पण वाचा.. खुशबू तावडे दोन मुलांसह माहेरी; डोंबिवलीतील घराचा सुंदर व्हिडीओ चर्चेत, नवऱ्या संग्रामची खास कमेंट









