lakhat ek aamcha dada shooting samplyanantar kalakaar goa gokarna firayla : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका “Lakhat Ek Aamcha Dada” आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही मालिका सुरु झाली होती आणि अवघ्या चौदा महिन्यांतच सूर्या दादा आणि त्याचं कुटुंब प्रेक्षकांना अलविदा करणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग लवकरच ऑनएअर होणार असून, शूटिंगदरम्यान कलाकारांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळालं.
या कथानकाच्या केंद्रस्थानी होता सूर्या दादा – चार बहिणींची काळजी घेणारा, जबाबदार भाऊ. ही भूमिका ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण याने साकारली होती. मालिकेच्या प्रवासात त्याच्यासोबत जुई तनपुरे, महेश जाधव आणि इतर कलाकारांनीही प्रेक्षकांची मने जिंकली. टीआरपीच्या चढ-उतारांच्या खेळात काही मालिका कमी कालावधीत संपतात आणि त्यातच “Lakhat Ek Aamcha Dada” चाहत्यांचा निरोप घेतेय.
मात्र, या मालिकेच्या टीमचा बॉण्डिंग इतका घट्ट आहे की, शूटिंग संपल्यावर सगळे कलाकार एकत्र गोवा-गोकर्ण सफरीला निघाले. समुद्रकिनाऱ्यांवरचा हा आनंदोत्सव त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमधून चाहत्यांना पाहायला मिळतो आहे. कलाकारांनी समुद्रकिनारी केलेली मौजमजा, एकत्रित हसरे क्षण आणि जुई तनपुरेचा वाढदिवस – हे सगळं चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतंय.
अभिनेता महेश जाधवने इन्स्टाग्रामवर टीमचे अनेक फोटो शेअर करताना खास कॅप्शन दिलं – “जो किताबों में ना मिलें दोस्तों, ऐसी दास्ताँ हैं हम!!”. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. मालिकेच्या शेवटानंतर कलाकारांनी अशा पद्धतीने एकत्र येऊन सुंदर आठवणी निर्माण करणं प्रेक्षकांनाही भावतंय.
‘Lakhat Ek Aamcha Dada’ मालिकेचा प्रवास थोडक्यात संपला असला, तरी या मालिकेतील व्यक्तिरेखा, कथानक आणि कलाकारांची एकत्रित केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहणार आहे.
हे पण वाचा.. “आईला नाव ठेवायचं होतं ‘लीना’, पण शेवटी ‘प्राजक्ता’; प्राजक्ता माळीने सांगितला खास किस्सा”









