lagnanantar hoilach prem navin mission jiva kavya : स्टार प्रवाहवरील चर्चेत असलेली मालिका Lagnanantar Hoilach Prem सध्या कथानकातील मोठ्या उलथापालथीमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. काही भागांपूर्वी मालिकेत असा ट्विस्ट पाहायला मिळाला की, जीवा आणि काव्याचं लग्नाआधीचं नातं सगळ्यांसमोर उघड झालं. वसु आत्या आणि रम्याने आखलेल्या डावामुळे जीवा-काव्याचे खासगी फोटो थेट पार्टीत रिव्हिल झाले आणि एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नंदिनी आणि पार्थ दोघांनाही मोठा धक्का बसला. नंदिनी तर ही गोष्ट सहन न होऊन चक्कर येऊन पडते आणि अखेर घर सोडण्याचा निर्णय घेते.
या सगळ्या गोंधळानंतर पार्थही काव्याला घरातून निघून जाण्यास सांगतो. माहेरी परतलेल्या काव्याला तिच्या वडिलांकडून अपमान सहन करावा लागतो, मात्र तिची आई तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. दुसरीकडे, मानिनीला आपल्या मुलांचे संसार मोडत असल्याचं दुःख सतावत असतं. नंदिनी घर सोडून गेल्याने आता घटस्फोट अटळ असल्याचं चित्र दिसत होतं आणि प्रेक्षकही निराश झाले होते.
मात्र, Lagnanantar Hoilach Prem च्या नव्या प्रोमोने सगळ्यांच्याच भावना बदलून टाकल्या आहेत. या प्रोमोमध्ये मालिकेत एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचं स्पष्ट दिसतं. नंदिनी-पार्थच्या नात्याला अजून एक संधी मिळावी, यासाठी जीवा आणि काव्या एकत्र येत ‘लग्नासाठी काहीपण’ हे खास मिशन सुरू करतात. स्वतःच्या चुकांची जाणीव असूनही ते दोघंही आपापल्या जोडीदारांची मनधरणी करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.
प्रोमोमध्ये काव्या पुन्हा देशमुखांच्या घरात जाण्याचा निर्धार करते. “ही मांजर तिच्या आर्किटेक्ट नवऱ्याला परत मिळवणारच,” असं ठामपणे सांगत ती पार्थसमोर उभी राहते. दुसरीकडे, जीवा नंदिनीच्या घरी पोहोचतो आणि “हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला पुन्हा घेऊनच जाणार,” असं म्हणत तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. या संवादांनी प्रोमो अधिकच भावनिक आणि सकारात्मक वाटतो.
हे पण वाचा.. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अडकणार विवाह बंधनात साखरपुड्याची जोरदार तयारी
या आशादायक प्रोमोला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला असून, जीवा-नंदिनी पुन्हा एकत्र येतील, यासाठी चाहते आतुर झाले आहेत. एकंदर पाहता, Lagnanantar Hoilach Prem मध्ये आता संघर्षानंतर प्रेम आणि समेटाचा नवा प्रवास सुरू होत असल्याचं चित्र दिसत आहे. ही मालिका स्टार प्रवाहवर रोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होते आणि पुढील भागांमध्ये काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. जेव्हा मी ६० वर्षांचा होईन…” – Salman Khan ची सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत









