lagnanantar hoilach prem nandini jiva new promo : स्टार प्रवाहवरील चर्चेत असलेली मालिका Lagnanantar Hoilach Prem सध्या वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. लग्नानंतर हळूहळू प्रेम फुलताना दाखवणाऱ्या या कथेत जीवा आणि नंदिनीमधील जवळीक दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. छोट्या-छोट्या प्रसंगांतून त्यांच्या नात्यातील आपुलकी, विश्वास आणि प्रेम प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. अलीकडच्या भागांमध्ये नंदिनीची आई शारदा नवऱ्यासोबत बाहेर जाणार असल्याने घराची चावी जीवाकडे सोपवते. हा छोटासा प्रसंगही जीवावर असलेला तिचा विश्वास अधोरेखित करतो.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने जीवाने नंदिनीला दिलेलं सरप्राइजही चर्चेचा विषय ठरलं. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, बायकांसाठी वाण आणि घरातलं सणासुदीचं वातावरण पाहून नंदिनी भारावून जाते. जिथे नंदिनीचे वडील जीवाच्या विरोधात भूमिका घेतात, तिथे नंदिनी ठामपणे नवऱ्याच्या बाजूने उभी राहते. या सगळ्या घडामोडींमुळे Lagnanantar Hoilach Prem मध्ये नंदिनीचं बदलतं व्यक्तिमत्त्व अधिक ठळकपणे समोर येत आहे.
दरम्यान, मालिकेत एक गमतीशीर पण वादग्रस्त प्रसंगही घडतो. पार्थने पाठवलेल्या पतंगाचा व्हिडिओ अपलोड करण्याऐवजी, गुड्डूच्या चुकीमुळे नंदिनी जीवाला अंघोळ घालत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जातो. त्यामुळे नंदिनी प्रचंड चिडते आणि जीवावर राग काढते. मात्र, याच कथानकातून पुढे एक अत्यंत भावनिक आणि थरारक प्रसंग उलगडणार आहे, ज्याचा झलक स्टार प्रवाहने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दाखवली आहे.
या प्रोमोमध्ये जीव नंदिनीच्या मांडीवर झोपलेला असून त्याला त्रास होत असल्याचं दिसतं. अॅलर्जी असूनही त्याने प्रॉन्स खाल्ल्यामुळे परिस्थिती गंभीर बनते. हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी एकही रिक्षा मिळत नाही, तेव्हा नंदिनी क्षणाचाही विचार न करता स्वतः रिक्षा चालवण्याचा निर्णय घेते. “लोकांनी पसारेवाल्याचं प्रेम पाहिलं, आता चकाचक बाईचा वेडेपणा पाहतील,” असं तिचं वाक्य तिच्या धाडसाचं प्रतीक ठरतं.
हे पण वाचा.. सिद्धार्थ खिरीड लग्नबंधनात अडकणार; हटके फोटोमधून वेडिंग डेट रिव्हिल, चाहत्यांमध्ये उत्सुकता
Lagnanantar Hoilach Prem च्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नंदिनीचा हा नवा अवतार, तिचं नवऱ्यावरचं निस्सीम प्रेम आणि धाडस प्रेक्षकांना विशेष भावलं आहे. अनेकांनी हा प्रोमो ‘एकदम फायर’ असल्याचं म्हटलं असून, मालिकेचे एपिसोड कंटाळवाणे न वाटता प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं दाखवतात, असंही मत व्यक्त केलं आहे. येत्या भागांमध्ये नंदिनीचं हे टोकाचं पाऊल कथेला कुठल्या दिशेने घेऊन जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. प्राप्ती रेडकर–शरयू सोनावणे यांचं खास बॉण्डिंग, मुलाखतीत उलगडलं मैत्रीचं नातं







