ADVERTISEMENT

लग्नानंतर होईल प्रेम : जीवा-नंदिनीची लव्ह स्टोरी पुन्हा फुलणार? पार्थ-काव्यामधील दुरावा कायमच

lagnanantar hoilach prem love tension update : लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या 29 जानेवारी 2026 च्या भागात जीवा-नंदिनी एकत्र लग्नासाठी जातात, तर दुसरीकडे पार्थ आणि काव्यामधील गैरसमज अजूनही मिटताना दिसत नाहीत.
lagnanantar hoilach prem love tension update

lagnanantar hoilach prem love tension update : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Lagnanantar Hoilach Prem मध्ये 29 जानेवारी 2026 च्या भागात भावनांचा गुंता अधिक घट्ट होताना दिसला. एका बाजूला जीवा आणि नंदिनी पुन्हा एकत्र येण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळतात, तर दुसऱ्या बाजूला पार्थ आणि काव्यामधील दुरावा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही.

या भागाची सुरुवात नंदिनी चित्राच्या लग्नासाठी तयारी करताना होते. ती फोनवर चित्राला सांगते की, जीवा तिच्यासोबत लग्नाला येणार आहे. नंदिनीची जाई तिची थोडी चेष्टा करते, मात्र नंदिनी तिच्या मनातील भावना चेहऱ्यावर येऊ देत नाही. तरीही जीवा आवडीचा रंगाची साडी नेसणार असल्याचं ती सहजपणे बोलून जाते. नंदिनीच्या मनात जीवा अजूनही आहे, हे तिच्या वागण्यातून स्पष्ट होतं.

दुसरीकडे देशमुखांच्या घरी जीवा मानिनीला खात्री देतो की, नंदिनी त्याला लवकरच माफ करेल. तो चित्राच्या लग्नासाठी शेरवानी घ्यायला आला असल्याचं सांगतो. मानिनी देवापुढे पेढे ठेवून सगळं नीट व्हावं अशी प्रार्थना करते. याच वेळी पार्थ ऑफिसमधील प्रोजेक्टची चांगली बातमी घेऊन येतो. काव्याने सुचवलेल्या कल्पनेमुळे क्लायंट खूश झाल्याचं तो सांगतो आणि काव्याचं मनापासून कौतुक करतो. मात्र हे कौतुक वसुंधरेला खटकतं, कारण तिच्या लेकीने मेहनत करूनही श्रेय काव्याला मिळालेलं असतं.

वसुंधरा टोमणे मारायला सुरुवात करते, पण मानिनी तिला शांत राहण्याचा सल्ला देते. जीवा खाली येताच पार्थ आनंदी होतो, पण 16 डिसेंबरच्या आठवणी त्याच्या मनात दाटून येतात आणि तो जीवाला जवळ करत नाही. वसुंधरा पुन्हा गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करते. तरीही जीवा ठामपणे सांगतो की, तो नंदिनीला घेऊनच परत येईल.

लग्नस्थळी जीवा आणि नंदिनी नटूनथटून पोहोचतात. सुंदर सजावट पाहून जीवा भारावून जातो आणि नंदिनीशी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी आनंदी असली तरी तिच्या वागण्यात थोडंसं अंतर जाणवतं. मात्र कन्यादानाच्या वेळी नंदिनी जीवालाच आपल्या शेजारी बसायला सांगते. हा क्षण जीवासाठी खास ठरतो. तो भविष्यात त्यांच्या मुलीच्या कन्यादानाचं स्वप्नही बोलून दाखवतो, ज्यामुळे नंदिनी लाजते.

दरम्यान, देशमुखांच्या घरी काव्या पार्थशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करते. ती त्याला परीक्षा केंद्रावर सोडण्याची विनंती करते, पण पार्थ स्पष्ट नकार देतो. काव्याचे प्रयत्न सुरूच राहतात, तर पार्थ मात्र स्वतःला प्रेमापासून दूर ठेवण्याचा हट्ट सोडायला तयार नसतो.

हे पण वाचा.. अजित पवारांच्या अखेरच्या निरोपावेळी सूरज चव्हाण भावुक, डोळ्यांत अश्रू अन् मनात पोरकेपणाची जाणीव

एकूणच Lagnanantar Hoilach Prem च्या या भागात प्रेम, गैरसमज आणि नात्यांमधील संघर्ष अधिक ठळकपणे समोर येतो. जीवा-नंदिनीची लव्ह स्टोरी पुन्हा खुलण्याच्या मार्गावर असताना, पार्थ-काव्याच्या नात्याचं भवितव्य मात्र अजूनही अनिश्चितच आहे.

हे पण वाचा.. हात जोडून, डोकं टेकवत अखेरचा निरोप; रितेश देशमुख अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी भावुक

lagnanantar hoilach prem love tension update