lagnanantar hoilach prem kavya ramya problem : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Lagnanantar Hoilach Prem सध्या जबरदस्त वळणावर आली आहे. कथानकात सुरू असलेल्या कटकारस्थानांमुळे देशमुख कुटुंबात गैरसमज, तणाव आणि भावनिक संघर्ष वाढताना दिसत आहे. वसू आणि रम्याच्या डावपेचांमुळे जीवा आणि काव्याच्या भूतकाळाविषयीची काही सत्ये समोर येतात आणि याचमुळे घरात मोठा गोंधळ निर्माण होतो.
या सगळ्या घडामोडींनंतर पार्थ काव्याला माहेरी जायचा सल्ला देतो. मात्र, पार्थचं प्रेम परत मिळवण्यासाठी काव्या पुन्हा देशमुखांच्या घरी येते. दुसरीकडे नंदिनी माहेरी गेल्यामुळे जीवा देखील तिचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी तिच्या घरी जातो. तो नंदिनीच्या घराच्या बागेत रिक्षामध्ये राहू लागतो. एकीकडे जीवा आणि दुसरीकडे काव्या, दोघेही आपल्या जोडीदारांचं मन जिंकण्यासाठी ‘लग्नासाठी कायपण’ हे मिशन सुरू करतात.
काव्या घरी परतल्यावर रम्याची अस्वस्थता वाढते. पार्थ आणि काव्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं पाहून रम्या पार्थसोबत लग्नाची स्वप्न पाहू लागते. मात्र काव्याचे प्रयत्न थांबत नाहीत. पार्थ तिला प्रेमाने ‘बोका’ म्हणतो, म्हणून काव्या एक खोटा बोका घरात आणते. पार्थ तिच्याशी फारसं बोलत नसल्याने काव्या त्या बोक्याशीच मन मोकळं करते आणि त्याची जीवापाड काळजी घेते.
Lagnanantar Hoilach Prem च्या नव्या प्रोमोमध्ये हीच गोष्ट मोठ्या वादाचं कारण ठरते. काव्या बोक्याशी खेळत असताना वरून रम्या आणि वसू हे सगळं पाहत असतात. वसू बोक्याचा बंदोबस्त करण्याचं सुचवते आणि रम्या बोक्याला खाली फेकते. काव्या बोक्याला शोधत असताना वरून कापूस पडतो. वर पाहिल्यावर रम्या आणि वसू तिथे उभ्या असल्याचं कळतं आणि काव्या संतापून रम्याचं नाव घेते.
हे पण वाचा.. कमळी मालिकेत थरार! सरोज कामिनीच्या जाळ्यात, पुढे काय होणार ?
या प्रोमोवर प्रेक्षकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रम्याविरोधात संतप्त कमेंट्सचा पाऊस पडत आहे. “आता रम्याचं काही खरं नाही”, “काव्याशी पंगा घेतलास, आता परिणाम भोग”, “रम्याला घराबाहेर काढा” अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. पुढील भागांमध्ये देशमुखांच्या घरात हा वाद आणखी वाढणार का आणि रम्याची खेळी उलटी पडणार का, हे पाहणं आता Lagnanantar Hoilach Prem च्या प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग मधील प्रिया-चैतन्यने ‘दुनियादारी’ सीन केला भन्नाट रिक्रिएट, सेटवरचा धमाल व्हिडीओ व्हायरल









