lagnanantar hoilach prem kavya parth love confession : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Lagnanantar Hoilach Prem मध्ये आजचा भाग भावनिक आणि तितकाच प्रभावी ठरला. पार्थ देशमुखच्या यशाच्या क्षणी त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काव्याने थेट प्रत्युत्तर दिलं. रम्याच्या डावपेचांवर पाणी फेरत, तिने सर्वांसमोर नवऱ्यावरचं प्रेम उघडपणे कबूल केल्याने हा भाग प्रेक्षकांसाठी खास ठरला.
पार्थ एका मुलाखतीसाठी पत्रकारांसमोर उभा असतो. वैयक्तिक आयुष्यातील अडचणी असूनही इतकं यश कसं मिळवलं, असा प्रश्न पत्रकार विचारतात. पुढे, ‘बायकोचा पाठिंबा नसतानाही शांतपणे यश कसं मिळवता?’ असा टोचणारा सवाल केला जातो. याच क्षणी काव्या तिथे दाखल होते आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं जातं. “कोणी सांगितलं मी पार्थ देशमुखांच्या पाठीशी नाहीये?” असा थेट सवाल करत तिने परिस्थितीचं चित्रच बदलून टाकलं.
रम्या काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र वसू रम्यालाच अडवते. काव्या पुढे येऊन पार्थचा हात हातात घेते आणि स्वतःची ओळख “मी मिसेस काव्या पार्थ देशमुख” अशी करून देते. पत्रकार तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल प्रश्न विचारतात, तसेच १६ डिसेंबरच्या घटनेचा उल्लेख करून तिला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र काव्या खचत नाही. उलट, ती अत्यंत आत्मविश्वासाने आणि स्पष्ट शब्दांत उत्तर देते.
काव्या सांगते की आजचा दिवस तिच्या नवऱ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या कर्तृत्वाच्या दिवशी भूतकाळ उकरून काढणं चुकीचं आहे. पार्थ देशमुख किती रॉयल आणि लॉयल आहे, त्याचं मन किती मोठं आहे, हे ती ठामपणे सांगते. भूतकाळ भूतकाळ असतो आणि वर्तमान व भविष्य हे प्रेमावर उभं असतं, असं म्हणत ती पार्थवर असलेलं नितांत प्रेम जाहीर करते. Lagnanantar Hoilach Prem या मालिकेत हा क्षण नात्याची ताकद दाखवणारा ठरतो.
दुसरीकडे, जीवाच्या प्रकृतीचीही कथा तितकीच तणावपूर्ण आहे. कोलंबी खाल्ल्यामुळे त्याची तब्येत बिघडते. गुड्डू डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरतो, मात्र जीव नंदिनीच माझी डॉक्टर आहे, असं सांगत हट्ट धरतो. नंदिनीला फोन केला जातो, पण तिच्या मनात जीवाच्या खोटेपणाची शंका निर्माण होते. अखेरीस जीव चक्कर येऊन पडतो. गुड्डू नंदिनीच्या घरात जाऊन शारदाला सगळं सांगतो, तरीही जीव उपचारांसाठी तयार होत नाही.
हे पण वाचा.. कोकणच्या मातीत रमले रवी जाधव; माघी गणेशोत्सवाची खास झलक सोशल मीडियावर शेअर
आजचा भाग प्रेम, विश्वास आणि ठामपणाचा संदेश देणारा ठरला. काव्याने पार्थच्या बाजूने उभं राहत दिलेली प्रेमाची कबुली Lagnanantar Hoilach Prem मालिकेतील एक संस्मरणीय क्षण बनली आहे.
हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६’ पहिली एलिमिनेशन: राधा पाटील घराबाहेर







