ADVERTISEMENT

अफेअरचं भांडं फुटलं! पार्टीत झळकले जीवा-काव्याचे फोटो; लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत वर्षपूर्तीला मोठा स्फोटक ट्विस्ट

Lagnanantar Hoilach Prem jiva kavya twist promo : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या वर्षपूर्तीच्या भागात जीवा-काव्याच्या अफेअरचं सत्य सर्वांसमोर येणार. पार्टीदरम्यान स्क्रीनवर झळकलेल्या रोमँटिक फोटोमुळे देशमुख कुटुंब हादरलं.
Lagnanantar Hoilach Prem jiva kavya twist promo

Lagnanantar Hoilach Prem jiva kavya twist promo :  प्रवाहवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये आता प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्टची मेजवानी मिळणार आहे. गेल्या काही प्रोमोमधून जीवा आणि काव्याच्या जुना नात्याचं रहस्य लवकरच उघड होणार असल्याची झलक दाखवली जात होती. त्यामुळे नेमकं काय घडणार याचा ताण प्रेक्षकांमध्ये वाढत होता. अखेर या गुपिताचं भांडं फुटणार कसं, हे दाखवणारा नवा प्रोमो प्रदर्शित झाला असून तो तुफान चर्चेत आला आहे.

ही मालिका येत्या १६ डिसेंबरला एक वर्ष पूर्ण करत आहे. वर्षपूर्तीचा हा भाग खास बनवण्यासाठी लेखकांनी मोठा ‘ड्रामा ट्विस्ट’ प्रेक्षकांसमोर आणला आहे. मालिकेत जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ या दोन जोडप्यांची लग्नं मनाविरुद्ध झाली होती. मात्र वेळ जसजसा पुढे गेला, तसतसं दोन्ही नात्यांमध्ये प्रेमाचा सुगंध पसरायला लागला. जीवाला ऑफिसमध्ये यश मिळणं आणि काव्याचं परीक्षेत उत्तीर्ण होणं, या दोन्ही गोष्टींच्या निमित्ताने देशमुखांनी भव्य पार्टीचं आयोजन केल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.

पार्टीत नंदिनी सर्वांना सांगते की, “एक वर्षापूर्वी नकळत आपण एकत्र आलो आणि आजचा दिवस विश्वास व प्रेमाचा उत्सव आहे.” तिच्या या भाषणानंतर स्क्रीनवर देशमुख कुटुंबातील वर्षभराच्या सुंदर आठवणी दाखवल्या जातात. सुरुवातीला जीव-नंदिनीचा फोटो झळकतो, ज्यामुळे नंदिनी लाजून हसते. लगेच काव्या-पार्थचा फोटो दिसतो… आणि मग क्षणात वातावरणच बदलून जातं.

अचानक मोठ्या स्क्रीनवर लग्नाआधीचे जीवा आणि काव्याचे रोमँटिक फोटो झळकतात. एका फोटोमध्ये जीवा कॅफेमध्ये काव्याला घास भरवताना दिसतो. हे फोटो पाहताच नंदिनी, पार्थ, मानिनी आणि विक्रम अक्षरशः अवाक् होतात. जीव आणि काव्यालाही या अनपेक्षित उघडकीमुळे मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे, वसु आत्या आणि रम्या मात्र खुष असतात, कारण हे फोटो त्यांनीच शोधून आणलेले असतात.

या प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून नेटकऱ्यांनी उत्साह व्यक्त करणाऱ्या असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “आता खरी मजा सुरू होणार”, “या ट्विस्टनंतर कथा कुठे वळते ते पाहायला उत्सुक आहोत” अशा प्रतिक्रिया भरभरून येत आहेत.

हे पण वाचा.. फक्त १५ एपिसोडनंतर Off-Air! ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा अंतिम भाग जाहीर; ईशाच्या Exit मुळे प्रेक्षक संतापले

१६ डिसेंबरला प्रसारित होणारा हा विशेष भाग Lagrianantar Hoilach Prem मालिकेचं कथानक नव्या वळणावर नेणार इतकं मात्र निश्चित. प्रेक्षकांसाठी ही स्फोटक उकल नक्कीच मनोरंजनाचा नवा डोस ठरणार आहे.

हे पण वाचा.. थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अंदाज, बिकिनीत दिसली बोल्ड आणि ग्लॅमरस

Lagnanantar Hoilach Prem jiva kavya twist promo