kushal badrike wife special reply : मराठी रंगभूमीपासून छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता Kushal Badrike नेहमीच आपल्या विनोदामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. पण फक्त रंगमंच किंवा टिव्हीवरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही कुशलचा विनोदी अंदाज कायम दिसून येतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला त्याचा एक व्हिडीओ.
या व्हिडीओत कुशल आपल्या पत्नी सुनयना बद्रिके सोबत दिसत आहे. सेटवर एकमेकांचा हात धरून चालत असतानाच त्याने चाहत्यांसाठी मजेशीर पोस्ट लिहिली. त्यात तो म्हणतो, “मी बायकोला विचारलं – माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा, ना मोठी नोकरी… तरी मला का पसंत केलंस?” या प्रश्नावर सुनयनाने दिलेलं उत्तर ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित आलं. सुनयनाने सांगितलं की, “मला तुझे डोळे फार आवडतात. कारण ते मनातलं काहीही लपवू शकत नाहीत.”
हा मजेशीर खुलासा ऐकून चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी या पोस्टवर हार्ट आणि लव्ह इमोजी shower केले, तर काहींनी “तुमचं प्रेम बघून छान वाटतं” असं लिहिलं. अभिनेत्री हेमांगी कवी हिनं सुनयनाच्या लूकचं कौतुक केलं, तर श्रेया बुगडे हिनं प्रेमभरली कमेंट केली. खुशबू तावडे आणि मेघना एरंडे यांनीही हार्ट इमोजी शेअर करत दाम्पत्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
कुशलच्या या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच गहजब उडवला आहे. चाहत्यांच्या नजरेतून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की, कलाकार फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही आपल्या साधेपणाने आणि प्रेमळ नात्यांनी लोकांच्या हृदयात घर करतात.
हे पण वाचा.. पारू फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने तब्बल वर्षभर लपवून ठेवलं लग्न; चाहत्यांना वाढदिवशी दिली गुडन्यूज!









