ADVERTISEMENT

“कुरळे ब्रदर्स परत सज्ज, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला”

"साडे माडे तीन" नंतर कुरळे ब्रदर्स पुन्हा धमाल घेऊन येत आहेत. दिग्दर्शक अंकुश चौधरी यांचा "पुन्हा एकदा साडे माडे तीन" हा कौटुंबिक विनोदी चित्रपट १४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
punha ekda sade made teen release

punha ekda sade made teen release : मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा विचार केला, तर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये “साडे माडे तीन” या चित्रपटाचा नावलौकिक आजही कायम आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील रतन, मदन आणि चंदन या कुरळे ब्रदर्सच्या भन्नाट केमिस्ट्रीमुळे प्रेक्षक पोट धरून हसले होते. आता तब्बल अनेक वर्षांनी ही धमाल तिकडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्यांचा नवा प्रवास “पुन्हा एकदा साडे माडे तीन” या नावाने १४ नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता-दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी केले असून, या वेळी कुरळे ब्रदर्ससोबत Siddharth Jadhavची भर पडणार आहे. ट्रेलर आणि पोस्टरमधूनच या चौकडीचा अवखळ अंदाज पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच अभिनेत्री रिंकू राजगुरूची एन्ट्री या हास्यकथेत आणखी रंगत आणणार आहे.

चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर अशी दमदार कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सर्वांची जुगलबंदी प्रेक्षकांना पुन्हा एकदा हास्याचा अखंड महापूर देईल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे.

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी मीडिया आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांनी केली आहे. निर्मात्यांमध्ये उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन यांचा समावेश आहे, तर यशराज टिळेकर आणि सौरभ लालवानी हे सहनिर्माते आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी प्रख्यात छायाचित्रकार संजय जाधव यांनी सांभाळली आहे.

हे पण वाचा.. Shilpa Shetty” आणि “Raj Kundra” यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी Lookout Notice जारी

दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे, “पहिल्या भागामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत. त्यामुळे जबाबदारी अधिक होती. मात्र संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे आम्ही नक्कीच त्या अपेक्षांना न्याय देऊ शकलो आहोत. हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असं परिपूर्ण मनोरंजनाचं पॅकेज आहे.”

मराठी सिनेसृष्टीला नेहमीच विनोदी चित्रपटांची खास परंपरा लाभली आहे. “साडे माडे तीन” ने त्या परंपरेला नवीन उंची दिली होती आणि आता “पुन्हा एकदा साडे माडे तीन” च्या माध्यमातून कुरळे ब्रदर्स प्रेक्षकांना निखळ आनंद देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

हे पण वाचा.. प्रिया मराठेच्या आठवणीत मृणाल दुसानीस भावुक; म्हणाली – Mrunal Dusanis on Priya Marathe