ADVERTISEMENT

नव्या घरातला पहिलाच बाप्पा माझ्यासाठी खास –लक्ष्मी निवास फेम अभिनेता Kunal Shukla ने केला आनंद व्यक्त

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धीराजची भूमिका साकारणारा कुणाल शुक्ला (Kunal Shukla) यंदा आपल्या नव्या घरात पहिल्यांदाच गणपती बसवत असून, या खास क्षणाबद्दल त्याने व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांच्या मनाला भिडल्या आहेत.
Kunal Shukla

गणेशोत्सवाच्या उत्साहाने सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. घराघरांत गणपती बाप्पाचे आगमन झाले असून सेलिब्रिटीदेखील या उत्सवात सहभागी होताना दिसत आहेत. मालिकांच्या धकाधकीच्या शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढत कलाकार आपल्या घरी बाप्पासाठी खास तयारी करत आहेत. ‘Kunal Shukla’ मालिकेत सिद्धीराज गाडेपाटीलची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता कुणाल शुक्ला (Kunal Shukla) याच्या घरी यंदा गणरायाचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे, या वर्षी त्याच्या नव्या घरातला हा पहिलाच गणपती असल्याने त्याच्यासाठी हा क्षण अधिकच खास ठरला आहे.

Kunal Shukla आपल्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला, “गणपती म्हणजे माझ्यासाठी असा सण आहे ज्यात सर्वजण एकत्र येतात, कामं बाजूला ठेवतात आणि सकारात्मक वातावरणात आनंद साजरा करतात. आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. मात्र, यावर्षीचा गणपती वेगळा आहे कारण हा माझ्या नवीन घरातील पहिला बाप्पा आहे. त्यामुळे मी खूप उत्साहित आहे आणि सजावटीचीही खास तयारी केली आहे.”

कलाकार म्हणून सतत शूटिंगच्या व्यापात अडकूनही Kunal Shukla ने आपल्या घरच्या गणेशोत्सवासाठी वेळ काढला. तो पुढे सांगतो, “मी सेटवरूनच सगळं मॉनिटर केलं. घरात बाप्पाची तयारी सुरू होती आणि त्याचवेळी सेटवर आमचं गणपतीचं शूटही सुरू होतं. सर्व कलाकारांना गणपतीच्या सुट्टीचा आनंद मिळावा म्हणून आम्ही डे-नाईट शूटिंग करून गणपतीचे सीन्स पूर्ण केले. त्यामुळे माझ्यासाठी या वर्षीचा गणेशोत्सव आधीच सुरू झाल्यासारखाच आहे आणि हा आनंद दुप्पट झाला आहे.”

हे पण वाचा .. Madhugandha Kulkarni झी मराठीवर कमबॅक; वकिलाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेक्षकांच्या मनात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतल्या भूमिकेमुळे वेगळं स्थान मिळवलेल्या Kunal Shukla च्या या अनुभवामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. नव्या घरातल्या पहिल्या बाप्पामुळे त्याच्यासाठी हा सण खास ठरत असून त्याचा उत्साह चाहत्यांपर्यंतही पोहोचला आहे.

हे पण वाचा.. Madhugandha Kulkarni झी मराठीवर कमबॅक; वकिलाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

Kunal Shukla इंस्टाग्राम पोस्ट..