ADVERTISEMENT

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेचा प्रवास संपला

kon hotis tu kay jhalis tu serial off air : स्टार प्रवाह वाहिनीवर नव्या मालिकांची सुरुवात होत असताना कोण होतीस तू काय झालीस तू ही गिरीजा प्रभू–मंदार जाधव यांची लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
kon hotis tu kay jhalis tu serial off air

kon hotis tu kay jhalis tu serial off air : स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना अनेक नवनवीन मालिका पाहायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहिनीचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणात बदलत असून काही जुन्या मालिकांना निरोप द्यावा लागत आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही नवी मालिका ५ जानेवारीपासून संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होत आहे. या बदलामुळे काही मालिकांच्या वेळांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.

या बदलांचा थेट परिणाम Kon Hotis Tu Kay Jhalis Tu या मालिकेवर झाला आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची वेळ १०:३० वाजताची करण्यात आल्यामुळे सध्या त्याच स्लॉटमध्ये प्रसारित होत असलेल्या Kon Hotis Tu Kay Jhalis Tu या मालिकेचं भवितव्य काय, असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. अखेर मुख्य अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टनंतर या मालिकेचा प्रवास संपत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu ही मालिका २८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेमुळे ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मधील लोकप्रिय जोडी गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव पुन्हा एकदा एकत्र दिसली. यावेळी त्यांनी यश आणि कावेरी ही पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. सुरुवातीला या मालिकेला रात्री ८ वाजताचा प्राइम टाइम स्लॉट मिळाला होता. मात्र, कालांतराने टीआरपी आणि वेळापत्रकातील बदलांमुळे मालिकेची वेळ आधी ११ वाजता आणि नंतर १०:३० वाजतापर्यंत बदलण्यात आली.

अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा वेळ बदलणं ही बाब मालिकेसाठी निर्णायक ठरली. नुकताच सेटवर शेवटचा शूटिंग डे पार पडला असून कलाकार आणि टीमने भावुक होत सोशल मीडियावर निरोपाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. गिरीजा प्रभू, मंदार जाधव यांच्यासह सुकन्या मोने, साक्षी गांधी, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, नंदिनी वैद्य, अमृता माळवदकर आणि वैभव मांगले यांसारख्या कलाकारांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

हे पण वाचा.. 2025 प्राजक्ता माळीसाठी कसं होतं? प्राजक्ता माळी चा भावूक रीकॅप व्हिडीओ

दरम्यान, ५ जानेवारीपासून रात्री १०:३० वाजता रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे Kon Hotis Tu Kay Jhalis Tu ही मालिका जरी ऑफ एअर होत असली, तरी तिच्या कथानकाने आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या आठवणींत कायमची जागा मिळवली आहे.

हे पण वाचा.. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे – झी मराठी सन्मानानंतर छाया कदम यांची भावनिक पोस्ट व्हायरल

kon hotis tu kay jhalis tu serial off air