ADVERTISEMENT

धर्माधिकाऱ्यांच्या आयुष्यात नवं वादळ! कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री सीमा देशमुख यांची दमदार एन्ट्री

kon hotis tu kay jhalis tu navi entry seema deshmukh : कोण होतीस तू काय झालीस तू या लोकप्रिय मालिकेत युगच्या आईच्या भूमिकेत सीमा देशमुख यांची एन्ट्री झाली असून, या नव्या पात्रामुळे कथानकात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
kon hotis tu kay jhalis tu navi entry seema deshmukh

kon hotis tu kay jhalis tu navi entry seema deshmukh : छोट्या पडद्यावरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांपैकी Kon Hotis Tu kay Jhalis Tu ही एक महत्त्वाची मालिका ठरली आहे. मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची घट्ट पकड घेतली आहे. कावेरी आणि यश या व्यक्तिरेखांमधील नातं, त्यातील चढ-उतार आणि भावनिक संघर्ष यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. कथानकात सातत्याने येणाऱ्या अनपेक्षित वळणांमुळे मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

सध्या Kon Hotis Tu kay Jhalis Tu मालिकेची कथा एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. एका अपघातात कावेरीच्या आयुष्यातील आधार असलेल्या यशचा मृत्यू होतो आणि त्यानंतर धर्माधिकारी कुटुंबात युगची एन्ट्री होते. विशेष म्हणजे युग आणि यश दिसायला हुबेहुब सारखे असले, तरी त्यांच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मंदार जाधव यांच्या दुहेरी भूमिकेमुळे ही मालिका अधिकच रंगतदार झाली असून, प्रेक्षकांमध्ये युगबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे.

आता या सगळ्यात आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. फिल्मी स्टाइलमध्ये वावरणाऱ्या युगच्या आईची मालिकेत एंट्री झाली असून, ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सीमा देशमुख साकारत आहेत. युगची आई थेट धर्माधिकाऱ्यांच्या घरी पोहोचते आणि तिच्या आगमनामुळे घरातील वातावरण ढवळून निघणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तिच्या मनात सुडाची भावना असल्याचं स्पष्टपणे जाणवत असून, तिचा नेमका उद्देश काय आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

सीमा देशमुख या मराठी मनोरंजनसृष्टीतील अनुभवी आणि नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अलीकडेच त्या ‘जारण’ या मराठी चित्रपटात झळकल्या होत्या. त्याशिवाय ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. आता Kon Hotis Tu kay Jhalis Tu मध्ये त्यांची एन्ट्री झाल्याने कथेला अधिक गडद आणि रंजक वळण मिळणार, हे नक्की.

हे पण वाचा.. 2025 अक्षया देवधर साठी खास ठरलेलं वर्ष; कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्वतःला पुन्हा शोधलं

युगच्या आईच्या आगमनानंतर धर्माधिकारी कुटुंबात नेमके कोणते वादळ निर्माण होणार, कावेरीच्या आयुष्यात पुन्हा कोणती उलथापालथ होणार आणि युगचा खरा चेहरा कधी समोर येणार, हे पाहणे आता प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. Kon Hotis Tu kay Jhalis Tu येत्या भागांमध्ये आणखी कोणते धक्कादायक खुलासे करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा.. अभिनयातून उद्योजकतेकडे… अमृता खानविलकर झाली बिझनेसवुमन, सुरू केला खास साड्यांचा ब्रँड

kon hotis tu kay jhalis tu navi entry seema deshmukh