KKR vs CSK सामना: प्लेऑफच्या आशा टिकवणार का कोलकाता, की चेन्नई करणार समीकरणं बिघडवण्याचा प्रयत्न?

KKR vs CSK

KKR vs CSK: करो या मरो! कोलकातासाठी अखेरची संधी, तर चेन्नईच्या प्रतिष्ठेचा सवाल – कोण मारेल बाजी?

IPL 2025 मध्ये आज 57वा सामना खेळला जाणार असून, तो कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात रंगणार आहे. KKR vs CSK हा सामना दोन्ही संघांसाठी वेगवेगळ्या कारणांमुळे महत्त्वाचा आहे. कोलकातासाठी ही लढत ‘करो या मरो’ अशी ठरणार आहे, तर चेन्नईसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे.

KKR vs CSK: कोलकातासाठी अंतिम संधी

सध्या कोलकाता नाईट रायडर्सने 11 सामन्यांत पाच विजय मिळवत 11 गुणांसह प्लेऑफच्या रेसमध्ये स्थान टिकवले आहे. मात्र, आता त्यांच्यासमोर तीन सामने उरले असून ते सर्वच जिंकणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. त्याचबरोबर इतर सामन्यांचे निकाल कसे लागतात, यावरही त्यांचे भविष्य अवलंबून आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या हंगामात फक्त दोन सामने जिंकले असून ते सर्वात खालच्या स्थानावर आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आता हा सामना प्रयोगांसाठी आणि संघाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी उरला आहे.

KKR vs CSK: हेड टू हेड मध्ये चेन्नई आघाडीवर

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 वेळा टक्कर झाली असून, त्यापैकी 19 सामने CSK ने जिंकले आहेत, तर KKR ने फक्त 11 विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे, कोलकाताच्या होमग्राउंडवरही चेन्नईचा पलडा जड आहे. येथे झालेल्या 10 पैकी 6 सामने त्यांनी जिंकले आहेत. मात्र, यंदाच्या मोसमात चेपॉकच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात KKR ने विजय मिळवला होता, त्यामुळे CSK आज त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे.

स्पिनर्सची खरी कसोटी

KKR vs CSK या सामन्यात स्पिन गोलंदाजांची लढत विशेष लक्षवेधी ठरणार आहे. KKR कडे वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि मोईन अलीसारखे जबरदस्त स्पिनर्स आहेत, ज्यांनी याच हंगामात चेन्नईला त्यांच्या घरी अवघ्या 103/9 धावांवर रोखले होते. दुसरीकडे, CSK कडे नूर अहमद, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विनसारखे अनुभवी फिरकीपटू आहेत.

IPL 2025 मध्ये कोलकाताच्या स्पिनर्सनी सर्वाधिक म्हणजे 31 विकेट्स घेतल्या आहेत, तर चेन्नईचे फिरकीपटूही 28 विकेट्ससह त्यांच्या मागे आहेत. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी यंदा स्पिनसमोर सर्वाधिक म्हणजे 32 विकेट्स गमावल्या आहेत आणि त्यांचा स्ट्राइक रेटही फक्त 124 आहे. त्यामुळे कोलकाताचे स्पिनर्स त्यांच्या घरच्या मैदानावर अधिक प्रभावी ठरू शकतात.

धोनी विरुद्ध स्पिनर्स: कोण वरचढ?

महेंद्रसिंह धोनी सध्या अनेकदा शेवटच्या ओव्हर्समध्ये फलंदाजीसाठी येतात. पण चेन्नईची फलंदाजी पाहता, त्यांना आज मधल्या षटकांतच मैदानात उतरावे लागेल, अशी शक्यता आहे. अशावेळी KKR चे स्पिनर्स धोनीसाठी अडथळा ठरू शकतात.

IPL मध्ये सुनील नारायणने धोनीला 16 पैकी फक्त 2 वेळा बाद केले असले, तरी धोनीचा नारायणविरुद्ध स्ट्राइक रेट फक्त 52 आहे. वरुण चक्रवर्तीने तर धोनीला 5 पैकी 3 डावांमध्ये बाद केले असून, त्याविरुद्ध धोनीचा स्ट्राइक रेट केवळ 63 आहे आणि सरासरी फक्त 4 धावांची आहे. आंद्रे रसेलनेही धोनीला 5 पैकी 2 वेळा बाद केले आहे, पण धोनी त्याच्याविरुद्ध 150 च्या स्ट्राइक रेटने धावा करतो.

रहाणेची परीक्षा स्पिनर्ससमोर

KKR चे कर्णधार अजिंक्य रहाणे यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी तीन अर्धशतकं ठोकली आहेत. पण स्पिन गोलंदाजांसमोर त्यांची कामगिरी कमकुवत दिसते. जलदगती गोलंदाजांविरुद्ध त्यांची सरासरी 104.5 आहे, पण स्पिनसमोर ती केवळ 16.9 आहे. ही सरासरी यंदाच्या IPL मध्ये 50 हून अधिक स्पिन चेंडू खेळलेल्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकाने सर्वात कमी आहे.

रहाणेचा स्ट्राइक रेटही स्पिनसमोर फक्त 115 आहे. CSK कडील जडेजा आणि अश्विनसारखे स्पिनर्स त्यांना आज पुन्हा अडचणीत आणू शकतात. IPL मध्ये जडेजाने रहाणेला फक्त एकदाच बाद केले असले, तरी रहाणे त्याच्याविरुद्ध 96 च्या स्ट्राइक रेटने खेळतात. अश्विनने मात्र रहाणेला 11 पैकी 6 वेळा बाद केले आहे, आणि त्याच्याविरुद्ध रहाणेचा स्ट्राइक रेट केवळ 102 आहे.

KKR vs CSK: कोण ठरणार विजेता?

KKR vs CSK या सामन्यात कोलकाताची फलंदाजी, त्यांचे फिरकीपटू आणि होमग्राउंडचा फायदा पाहता त्यांच्यावरच विजयाची अपेक्षा आहे. पण चेन्नई सुपर किंग्ससारखा संघ, जो काहीही गमावण्याच्या स्थितीत नाही, ते कोणतीही अचंबित करणारी खेळी करून कोलकाताचे समीकरण बिघडवू शकतो. त्यामुळे आजचा सामना अत्यंत रोचक आणि उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही.

हे पण वाचा ..rahul vaidya ने विराट कोहलीवर टीका केली; अवनीतच्या प्रकरणावरुन केलं चिमटा, इंटरनेटवर चर्चांना उधाण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *