ADVERTISEMENT

खुशबू तावडे दोन मुलांसह माहेरी; डोंबिवलीतील घराचा सुंदर व्हिडीओ चर्चेत, नवऱ्या संग्रामची खास कमेंट

khushbu tawade maher dombivli video

khushbu tawade maher dombivli video : खुशबू तावडे (Khushbu Tawade) या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासोबत घालवलेल्या खास क्षणांची झलक सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. मालिकांमधील तिच्या सहज स्वभावामुळे आणि मातृत्वाच्या नाजूक भावनांमुळे चाहत्यांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलेल्या खुशबू तावडे ने या वेळी दोन्ही मुलं राघव आणि राधीसह डोंबिवलीतील माहेरला भेट दिली. हा खास कुटुंबीय व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे.

खुशबूचं माहेर डोंबिवलीत असून, अभिनेत्रीने अचानक दिलेल्या भेटीमुळे तिच्या आईसह घरातील मंडळींमध्ये आनंदाची लहर पसरली. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, दरवाजा उघडताच लहान राघव आपल्या आजीला पाहून अक्षरशः आनंदानं उड्या मारतो. मुलांच्या या निखळ भावनेनं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

या भेटीदरम्यान खुशबूची सख्खी बहीण आणि अभिनेत्री तितीक्षा देखील उपस्थित होती. बहिणींची गोड मैत्री आणि घरातील वातावरणात पसरलेलं ते सुखद समाधान व्हिडीओमध्ये स्पष्ट जाणवतं. तिघी—खुशबू, तितीक्षा आणि त्यांची आई—यांनी एकत्र स्वयंपाकघरात बनवलेलं घरगुती जेवण चाहत्यांना तर भावलं, पण अनेकांनी “माहेरचं प्रेम वेगळंच!” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

व्हिडीओमधील आणखी एका दृश्याने विशेष लक्ष वेधले—चिमुकली राधी आजीसोबत देवाला नमस्कार करताना दिसते. तिच्या या निरागस मुद्रेनं घरातील संस्कारांची गोड आठवण अनेकांना झाली. संपूर्ण कुटुंब एकत्र दिसल्यामुळे व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळत आहे.

यातील आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे अभिनेत्रीचा पती संग्राम साळवी याची प्रतिक्रिया. त्याने हा व्हिडीओ स्वतःच्या हँडलवर री-शेअर करत खास हार्ट इमोजी टाकला. त्याच्या या छोट्याशा इशाऱ्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हे पण वाचा.. आली शुभपुर्वसंध्या! ‘लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव च्या हळदीचा जल्लोष; भावाने शेअर केला खास व्हिडीओ

खुशबू तावडे ने यापूर्वी सासरच्या कोल्हापूर येथील घराचा एक व्हिडीओ शेअर केला होता. आता तिने माहेरच्या आठवणींनी भरलेला नवीन व्हिडीओ टाकताच नेटिझन्सनी “माहेर म्हणजे सुख”, “आपली डोंबिवली”, “सुकून…” अशा भावना व्यक्त करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

खुशबू तावडे चे हे कौटुंबिक क्षण अनेकांसाठी भावनिक ठरले असून, अभिनेत्रीच्या साधेपणावर चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.

हे पण वाचा.. बॉयफ्रेंड हवा तरच शो! निक्की तांबोळी चा बिग बॉस मराठी ५ मधील सस्पेन्सफुल किस्सा समोर

khushbu tawade maher dombivli video