ADVERTISEMENT

“बाबा म्हणून…” kedar shinde ची लेकीसाठी भावनिक पोस्ट; सना शिंदेचा वाढदिवस साजरा करत शेअर केला खास ‘एआय’ फोटो

kedar shinde emotional post daughter Sana Shinde : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लेकी सना शिंदेच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर शेअर केलेली भावनिक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी शेअर केलेल्या ‘एआय’ फोटोत लहान सना तिच्याच मोठ्या रूपाच्या कडेवर दिसत आहे, आणि याच क्षणातून त्यांनी वडिलांची भावना शब्दांत मांडली आहे.
kedar shinde emotional post daughter Sana Shinde

kedar shinde emotional post daughter Sana Shinde : प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक Kedar Shinde यांनी आपल्या मुली अभिनेत्री Sana Shinde च्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. वडिलांनी मुलीबद्दल व्यक्त केलेले प्रेम, वेळेची जाण आणि आठवणींची गाठ या पोस्टमधून स्पष्ट जाणवते.

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एक खास ‘एआय’ फोटो आहे. त्या फोटोत लहान सना तिच्याच मोठ्या रूपाच्या, म्हणजे सध्याच्या सनाच्या कडेवर बसलेली दिसते. हा फोटो पाहताच भावनांचा ओलावा नजरेतून स्पष्ट दिसतो. “हा फोटो मला मिळाल्याक्षणी ठरवलं होतं की, वाढदिवशी हाच पोस्ट करणार. या छोट्या सनाच्या लहानपणात मी अनेक क्षण गमावले… त्याचाच थोडासा हिशोब मनात चालू आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

आपल्या कामातील व्यस्ततेमुळे मुलीच्या बालपणातील काही क्षण गमावल्याची खंत त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केली. मात्र त्याच वेळी त्या व्यस्ततेतूनच आजचे यश मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. “आयुष्यात काही ना काही मिळतं आणि गमावतंही… हेच जीवन आहे,” असे ते म्हणाले.

सना शिंदेला शुभेच्छा देताना त्यांनी लिहिले, “आज तुझा वाढदिवस तिथी आणि तारीख दोन्ही जुळून आलेला आहे. बाबा नेहमी तुझ्या पाठीशी आहेतच. स्वामी समर्थांचा आशीर्वादही तुझ्यावर आहे. सूर्यफुलासारखी फुलत जा, आपला मार्ग स्वतः तयार कर. तुला जे हवंय ते कदाचित नसेल मिळालं, पण स्वामी जे चांगलं आहे ते नक्कीच देतील.” वडिलांनी मुलीला दिलेले हे आशीर्वाद आणि स्वामी समर्थांवरील श्रद्धा यामुळे ही पोस्ट आणखी भावनिक झाली आहे.

मनोरंजन विश्वातील केदार शिंदे हे नाव प्रेक्षकांना अनोळखी नाही असा एक ही प्रेक्षक नाही. मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर त्यांनी दिलेला ठसा आजही ठळक आहे. ‘सही रे सही’, ‘लोच्या झाला रे’ आणि ‘श्रीमंत दामोदरपंत’ यांसारखी त्यांची नाटके आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. ‘अगं बाई अरेच्चा!’, ‘जत्रा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली.

अलीकडेच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘घडलंय बिघडलंय’ आणि ‘साहेब, बीबी आणि मी’ यांसारख्या मालिकांमुळेही ते प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करू शकले. त्यांची लेक सना शिंदे हिने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हे पण वाचा.. स्वप्नील जोशी आणि भाऊ कदमची हटके जोडी, ‘Premachi Goshta 2’ मधून दिवाळीत रंगणार नव्या अंदाजात रोमँस

वडिलांची भावनिक पोस्ट आणि एआय फोटोतून दिसलेले प्रेम यामुळे केदार शिंदे आणि सना शिंदे यांची ही बाबा-मुलगी जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

हे पण वाचा.. http://‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरची दिवाळी आठवण; म्हणाली – “पहाटे फटाके फोडण्यात होती खरी मजा”

kedar shinde emotional post dad daughter bond