karishma tanna anger on firecrackers post : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साह. पण या उत्साहात काहीवेळा अतिरेकही दिसतो आणि त्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. नुकतंच असंच काहीसं अनुभवलं अभिनेत्री Karishma Tanna हिनं. फटाक्यांच्या जोरदार आवाजाने तिची झोप मोडली आणि ती संतापून सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त केली.
करिश्मा तन्नाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. “सकाळी ६ वाजता फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. जग अजून विश्रांती घेत असताना कोणीतरी मोठ्या आवाजात साजरा करत होतं. अशा वेळी माझ्या मनात विचार आला – आपल्या सणांच्या साजऱ्याचं खरं रूप हेच आहे का?” अशा शब्दांत तिनं आपली नाराजी मांडली.
तिनं पुढे म्हटलं की, “आपण आपल्या मुलांना शिकवतोय का की आनंद म्हणजे मोठा आवाज, धूर आणि इतरांना त्रास देणं? पाळीव प्राण्यांना या फटाक्यांच्या आवाजामुळे भीती वाटते, काहीजण तर थरथर कापतात. मग आपण खरंच सण साजरा करत आहोत का?”
Karishma Tanna हिनं या पोस्टद्वारे लोकांना विचार करायला भाग पाडलं आहे. तिनं आपल्या चाहत्यांना आवाहन केलं की, “आपण अशी पिढी बनवूया जी सण म्हणजे प्रकाश आणि शांततेचा उत्सव समजते, प्रदूषणाचा नव्हे.” तिनं #SayNoToCrackers, #BeTheChange, आणि #ForOurPlanet हे हॅशटॅग वापरत पर्यावरण संरक्षणाचा मजबूत संदेश दिला.
करिश्मा तन्ना ही केवळ एक लोकप्रिय अभिनेत्रीच नाही, तर समाजातील संवेदनशील मुद्द्यांवर आवाज उठवणारी कलाकार म्हणूनही ओळखली जाते. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘नागिन ३’, ‘कयामत की रात’ अशा मालिकांमधून आणि ‘बिग बॉस ८’, ‘खतरों के खिलाडी १०’ सारख्या रिअॅलिटी शोमधून तिनं प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे.
हे पण वाचा.. विनोदाचा बादशहा हरपला! ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं ७४व्या वर्षी निधन
दिवाळीच्या सणानंतर वाढलेलं वायू आणि ध्वनी प्रदूषण हे सध्या चिंतेचं कारण बनलं आहे. त्यामुळे Karishma Tanna सारख्या सेलिब्रिटींनी शांततेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचं आवाहन केल्याने अनेकांना याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो.
हे पण वाचा.. “‘मी त्याला शिवी दिली…’ महेश मांजरेकरांचा सलमानवर संताप, पुढील चित्रपटावर घेतला मोठा निर्णय!”
karishma tanna anger on firecrackers post










