ADVERTISEMENT

“कमळीवर संकट, हृषीचा धडाकेबाज प्रवेश! अनिकाचा कपटी प्लॅन झाला फस?”

kamli maliket anika cha navin dav hrushi madtila : ‘कमळी’ मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. कॉलेजमध्ये कमळीला काही मुलं छेडताना दिसत आहेत, मात्र वेळेत पोहोचलेला हृषी त्या सर्वांना धडा शिकवताना दिसतो. अनिकाचा हा नवा कट किती दूरवर जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
kamli maliket anika cha navin dav hrushi madtila

kamli maliket anika cha navin dav hrushi madtila : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून त्यात भावनिक आणि थरारक ट्विस्ट पाहायला मिळतोय. या प्रोमोमध्ये कॉलेजच्या परिसरात काही मुलं कमळीची छेड काढताना दिसतात आणि परिस्थिती गंभीर वळण घेते. मात्र त्याच वेळी हृषी तिला वाचवण्यासाठी योग्य वेळी पोहोचतो आणि त्या मुलांना चांगलाच धडा शिकवतो.

मालिकेत यापूर्वी दाखवले गेले होते की, अनिकाने कमळीवर गंभीर आरोप करत तिला कॉलेजमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. तिने कमळीने तिच्या चेहऱ्यावर केमिकल टाकल्याचा खोटा आरोप करून सगळ्यांसमोर तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कमळीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि धैर्याने तो आरोप चुकीचा ठरवून आपलं नाव स्वच्छ केलं.

आता समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये अनिका पुन्हा एकदा कमळीला अडचणीत आणण्यासाठी नवा डाव आखताना दिसते. तिच्या या कारस्थानात तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये कॉलेजमधील काही मुलं कमळीला त्रास देताना दिसतात. एक मुलगा तिची छेड काढत अश्लील वक्तव्य करतो, आणि त्याच वेळी लॅपटॉपवर एक व्हिडीओ दाखवला जातो ज्यात कमळी “माझ्या मैत्रिणीला वोट करा आणि एक किस मिळवा” असं बोलताना दिसते. हे पाहून कमळी घाबरते आणि परिस्थिती हाताबाहेर जाते.

दरम्यान, अनिका व तिच्या मैत्रिणी या सगळ्या प्रसंगाचा आनंद घेत दरवाज्याच्या आडून बघत असतात. मात्र, नेमक्या क्षणी हृषी त्या ठिकाणी पोहोचतो आणि मुलांना दूर ढकलून कमळीची सुटका करतो. यानंतर मालिकेचा पुढचा भाग आणखी रोचक होणार आहे, कारण हा व्हिडीओ खरंच कमळीने म्हटलेला आहे का, की अनिकाने तंत्रज्ञानाच्या मदतीने तो बनवला आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.

अनिकाचा हा नवा डाव केवळ कमळीचं जीवन कठीण बनवणार नाही, तर कॉलेजमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही नवीन वाद निर्माण करणार आहे. कारण कमळीची मैत्रीण अनिकाच्या विरोधात जनरल सेक्रेटरी पदासाठी उमेदवारी देत आहे. त्यामुळे अनिकाचा राग अधिकच वाढला आहे आणि ती कमळीवर सूड उगवण्यासाठी कुठलीही सीमा ओलांडायला तयार आहे.

हे पण वाचा.. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कृष्णा-दुष्यंतच्या लग्नानंतर रंगणार जागरण गोंधळ; समृद्धी केळकरने चाहत्यांना दिलं खास आमंत्रण!

आता हृषीच्या मदतीने कमळी या संकटातून बाहेर पडते का आणि या प्रसंगानंतर तिचा हृषीवरील राग कमी होतो का, हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट निश्चित – ‘कमळी’ मालिकेचा हा नवीन प्रोमो मालिकेला पुन्हा एकदा TRP चार्टवर अव्वल स्थानी नेणार, यात शंका नाही.

हे पण वाचा.. सविता प्रभुणे म्हणाल्या – “इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, ते पाहून Savita Prabhune Gharo Ghari Matichya Chuli

kamli maliket anika cha navin dav hrushi madtila