kamli malika rajan kamli mulgi satya twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Kamli सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच भावनिक कथा, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि सातत्याने येणारे नवे ट्विस्ट यामुळे या मालिकेने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे Kamli मालिकेत आणखी एक मोठा आणि थरारक वळण येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
कमळी ही कोल्हापुरातील एका छोट्याशा गावातून शहरात शिक्षणासाठी आलेली साधी, स्वाभिमानी मुलगी आहे. शहरात आल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. नियतीच्या खेळामुळे ती नकळतपणे आपल्या खऱ्या कुटुंबाच्या जवळ येते. मात्र, ज्यांना ती भेटते तेच तिचे वडील राजन महाजन आणि आजी अन्नपूर्णा महाजन आहेत, याची कल्पनाही तिला नसते. दुसरीकडे, अन्नपूर्णा महाजन अनेक वर्षांपासून आपल्या हरवलेल्या नातीचा शोध घेत आहेत. कमळीची आई गौरी यांनी मुलीच्या जीवाला धोका असल्यामुळे तिला तिच्या खऱ्या कुटुंबापासून दूर ठेवलं होतं, हे सत्य हळूहळू उलगडताना दिसत आहे.
आता Kamli मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये कमळीचा जीव गंभीर धोक्यात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. रुग्णालयात असलेल्या कमळीला कामिनी त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिच्या कटकारस्थानामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. कमळीला वाचवण्यासाठी दुर्मीळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ची गरज असल्याचं डॉक्टर आणि नर्स सांगतात. हा रक्तगट अत्यंत दुर्मीळ असून, तो योगायोगाने राजन महाजन यांचाच आहे.
या प्रोमोमध्ये रुग्णालयातील तणावपूर्ण वातावरण, कामिनीची धमकी आणि कमळीच्या जीवावर आलेला प्रसंग प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. विशेष म्हणजे, याच रुग्णालयात राजन महाजनही उपस्थित असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, राजन नकळत आपल्या मुलीला रक्तदान करून तिचा जीव वाचवणार का? आणि या निमित्ताने कमळीच आपलीच मुलगी आहे, हे सत्य राजनसमोर येणार का?
हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा’मधील मधुरा जोशीचं थेट बॉलीवूडमध्ये पदार्पण; आमिर खानच्या सिनेमात झळकणार!
हा सारा थरारक भाग २१ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Kamli मालिकेचा हा टप्पा भावनिक, नाट्यमय आणि निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट आहे. कमळी आणि राजन यांच्या नात्याचं सत्य उघड होणार की अजून काही अडथळे येणार, हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. १७ वर्षांचा सोबती हरपला…”सोहम बांदेकरच्या लाडक्या सिंबाचं निधन, भावुक पोस्टने डोळे पाणावले









