kamli anika faceoff decision of fate : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Kamli पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमुळे कथानकात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रोमोमध्ये अनिका आणि कमळी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतो, ज्यामुळे पुढील भागांविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रोमोची सुरुवात साप सीडी पासून होते एक साईडला अनिका आणि दुसऱ्या साईटला कमळी थांबलेल्या दाखवल्या आहेत आणि प्रोमो मध्ये या दोघींन मधील शाब्दिक संघर्ष दाखवला गेला आहे तर याची सुरुवात अनिकाच्या आरोपांपासून होते. ती कमळीला थेट सुनावते की, अन्नपूर्णा आजीची नात बनून थेट वर गेली. रोज घरात नवीन games खेळून strong होत गेली, असा टोला अनिका लगावते.
मात्र Kamli मालिकेतील कमळी या आरोपांना ठाम शब्दांत उत्तर देते. ती स्पष्ट सांगते की हे खेळ नसून सत्य आहे. तिच्या या उत्तरातून आत्मविश्वास आणि स्वाभिमान दिसून येतो. अनिका मात्र मागे हटताना दिसत नाही. ती इंग्रजीतच ‘Now this is my turn’ असे म्हणत आव्हान करते. इतकेच नव्हे तर कमळी या घराची खरी नात नाही, असा गंभीर आरोप करत ती स्वतःकडे ‘सॉलिड प्रूफ’ असल्याचा दावा करते.
हे पण वाचा.. लक्ष्मी निवास मालिकेत जयंत मुळे होळीचा रंग बेरंग होणार का..?
या विधानामुळे कथानकाला नवे वळण मिळाले आहे. प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो – खरोखरच अनिकाकडे ठोस पुरावा आहे का, की हा केवळ आणखी एक डाव आहे?
कमळी मात्र परिस्थितीसमोर न डगमगता शांतपणे उत्तर देते. “तू तुझा गेम खेळ, माझ्या नशिबाचा निकाल मी स्वतः लावीन,” असे म्हणत ती स्वतःच्या सत्यावर ठाम असल्याचे दाखवते. तिच्या या भूमिकेमुळे तिचा स्वभाव अधिक ठळकपणे समोर येतो.
kamli anika faceoff decision of fate
झी मराठीने प्रोमोसोबत विचारलेला प्रश्नही तितकाच उत्कंठावर्धक आहे – कमळीच्या नशिबी हार आहे का, की अनिकाचेच फासे उलटे पडणार? या एका प्रश्नानेच मालिकेच्या पुढील भागांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.
हे पण वाचा.. गोपाळचा नवा डाव; शालिनी ठरणार का त्याच्या कटाचा भाग?
एकूणच, Kamli मालिकेतील हा नवा संघर्ष प्रेक्षकांना भावनिक आणि नाट्यमय अनुभव देणार हे नक्की. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे अनिकाच्या ‘सॉलिड प्रूफ’मागचे सत्य आणि कमळीच्या नशिबाचा अंतिम निर्णय काय ठरणार याकडे.









