kamali serial saroj kamini major twist : स्टार प्रवाहवरील Kamali मालिका सध्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लपून राहिलेलं एक मोठं सत्य आता उघड होण्याच्या मार्गावर आहे. सरोज आणि कामिनी या दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा अखेर एकमेकांसमोर आल्या असून, या भेटीमुळे संपूर्ण कथानकाला वेगळंच वळण मिळालं आहे.
महाजन कुटुंबाची संपत्ती आणि हरवलेली मोठी नात, हा Kamali मालिकेचा केंद्रबिंदू आहे. अन्नपूर्णा आजीला तिची मोठी नात एकेदिवशी घरी परत येईल, यावर अढळ विश्वास आहे. याच विश्वासामुळे ती मालमत्ता अनिकाच्या नावावर करण्यास आजतागायत तयार नव्हती. मात्र, धूर्त कामिनीला ही सगळी प्रॉपर्टी कोणत्याही किंमतीत हवी आहे. म्हणूनच ती अन्नपूर्णा आजीकडून सहा महिन्यांची मुदत घेते. या काळात मोठी नात परत आली नाही, तर संपत्ती अनिकाच्या नावावर करण्याचं वचन ती घेताना दिसते.
या सगळ्या गोंधळात सरोजकडे सर्वात मोठं गुपित आहे. कमळी हीच अन्नपूर्णा आजीची हरवलेली नात आणि सरोज-राजन यांची मुलगी आहे, हे सत्य फक्त सरोजलाच माहीत आहे. पण हे गुपित उघड होण्याआधीच कथेत मोठा धक्का बसतो. कामिनी सरोजला आपल्या तावडीत पकडते आणि तिचं अपहरण केलं जातं. नव्या प्रोमोमध्ये सरोजवर होणारा अमानुष अत्याचार, तिला बांधून ठेवलेलं दृश्य पाहून प्रेक्षकही हादरून जात आहेत. मात्र, इतका छळ सहन करूनही सरोज कमळीबद्दल एक शब्दही बोलत नाही.
दुसरीकडे, कमळीला या सगळ्याची कल्पनाच नसते. ती अन्नपूर्णा आजीला वचन देते की, वाईट प्रवृत्तींचा नायनाट करून ती आजीची मोठी नात शोधून काढेल. पण प्रत्यक्षात तिची आई सरोजच या संकटात अडकलेली आहे, हे तिला ठाऊक नसतं. त्यामुळे Kamali मालिकेत मायलेकींच्या भेटीचा क्षण कधी येणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरोज कामिनीच्या जाळ्यातून सुटणार का? कमळी आपल्या आईच्या मदतीला वेळेत पोहोचेल का? आणि जर या दोघींची भेट झालीच, तर सरोज अखेर भूतकाळाचं गूढ उलगडणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत.
हे पण वाचा.. ठरलं तर मग मधील प्रिया-चैतन्यने ‘दुनियादारी’ सीन केला भन्नाट रिक्रिएट, सेटवरचा धमाल व्हिडीओ व्हायरल
Kamali मालिकेतील हा विशेष आणि थरारक भाग १९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महाट्विस्टमुळे मालिकेची रंगत आणखी वाढली असून, प्रेक्षक डोळे लावून पुढील घडामोडींची वाट पाहत आहेत.
हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6 : रुचिता जामदारचा आरडाओरडा पडला महागात, पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेशची कानउघडणी









