ADVERTISEMENT

कमळी मालिकेत रंगणार कबड्डीचा थरारक सामना ; आत्मसन्मानासाठी उभी राहणार कमळी

झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिके मध्ये आता कबड्डीचा उत्साह, आत्मसन्मानाची लढाई आणि नवा गुरू यांच्या आगमनामुळे प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे.
kamali serial kabaddi tharark samana

kamali serial kabaddi tharark samana : झी मराठीवरील कमळी मालिका प्रेक्षकांना रोज नवे ट्विस्ट देत आहे. एका गावकरी मुलीची जिद्द, तिचा आत्मसन्मान आणि संघर्ष या सगळ्याची कहाणी या मालिकेत प्रभावीपणे मांडली जात आहे. ‘कमळी’ने आपल्या साध्या पण ठाम स्वभावामुळे चाहत्यांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे.

नुकत्याच दाखवलेल्या भागात कथानकाला नाट्यमय कलाटणी मिळाली. घरगुती वादामुळे कमळीला घर सोडावं लागतं आणि याच परिस्थितीचा फायदा घेत अनिका तिची सर्वांसमोर खिल्ली उडवते. अनिकाचा वाढता अहंकार कॉलेजमध्येही दिसून येतो. या दरम्यान कॉलेजमध्ये आंतरराज्य कबड्डी स्पर्धेची घोषणा केली जाते, जी कमळीच्या आयुष्यात नवी संधी घेऊन येणारी ठरते.

तथापि, संघप्रमुख असलेली अनिका कमळीचा सहभाग रोखते. पण कबड्डी सर मात्र तिच्यातील क्षमता ओळखून तिला पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. सरांचा विश्वास असूनही, प्राचार्यांच्या सूचनेनुसार अंतिम निर्णय अनिकाचाच असतो आणि ती तिच्या वैरभावनेतून कमळीला संघाबाहेर ठेवते.

याचवेळी अनिकाच्या घरी काही पुरावे सापडतात जे अन्नपूर्णा आजीसमोर कमळीबाबतचं सत्य उघड करतं. मात्र कॉलेजच्या मैदानावर अनिका मुद्दाम कमळीला हरवण्याचं प्लॅनिंग करते. छोट्या कबड्डी सामन्यात कमळी अपमानित होते, पण तिचा आत्मविश्वास ढळत नाही. उलट तो अधिक मजबूत होतो.

हे पण वाचा.. “तुम्ही मालिकेत पाहता स्वानंदीला… पण बालपणी तिचं खरं नाव होतं अगदी वेगळंच!”

कमळीची ही जिद्द पाहून कबड्डी सर तिला मार्गदर्शनाची गरज असल्याचं सांगतात आणि येथेच तिच्या आयुष्यात एका नव्या गुरूचा प्रवेश होतो. हा गुरू फक्त प्रशिक्षक नसून कमळीच्या चिकाटीला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक ठरतो. मानसिक आणि शारीरिक तयारी करून कमळीला मैदानासाठी सज्ज करण्यात तो मोठी भूमिका बजावणार आहे.

अनिका आणि कमळी यांच्यातील सामना आता अधिक तीव्र होत जाणार असून पुढील भागांत कबड्डीचा थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. आत्मसन्मान आणि सत्यासाठी लढणाऱ्या कमळीच्या प्रवासाला आता नवा टप्पा गाठता येणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे पण वाचा.. बिग बॉस 19 : 19 वर्षांनी अर्शद वारसीचं पुनरागमन, सलमान खानऐवजी करणार सूत्रसंचालन

kamali serial kabaddi tharark samna