ADVERTISEMENT

कमळी मालिकेत धडाकेबाज ट्विस्ट! अनिका करणार हृषीला प्रपोज, कमळी–हृषीच्या नात्यात नवं वळण?

kamali serial anika propose hrushi twist : ‘कमळी’ मालिकेत नाट्यमय घडामोडी! अनिकाच्या प्रेमप्रस्तावामुळे कमळी–हृषीचं नातं कसली परीक्षा देणार, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता.
kamali serial anika propose hrushi twist

kamali serial anika propose hrushi twist : झी मराठी वरील लोकप्रिय मालिका(Kamali) मध्ये आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना मोठा भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत शांतपणे उलगडत चाललेलं कथानक आता प्रेम, तणाव आणि गैरसमजांनी भरलेल्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. अनिका आणि हृषी यांच्यातील बदलती भावना तसेच कमळीच्या मनातील दुखावलेपणामुळे कथानकात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे प्रसंग उभे राहणार आहेत.

अलीकडेच प्रसारित झालेल्या भागात नायशाच्या डान्स क्लासवरून कमळी आणि नयनतारा यांच्यात जोरदार वाद झाल्याचं दाखवलं गेलं. हृषीची आई असलेल्या नयनताराने कमळीशी केलेल्या अपमानस्पद वागणुकीनंतर कमळीने इनामदारांच्या घरात पुन्हा पाय ठेवणार नाही, असा ठाम निर्णय घेतला. हा निर्णय हृषीला अतिशय त्रासदायक ठरतो. आईच्या वर्तणुकीमुळे कमळीच्या मनाला ठेस पोहोचली हे त्यालाही जाणवतं, मात्र परिस्थितीवर त्याचं नियंत्रण नसल्यामुळे तो अधिकच तणावात सापडतो.

याचदरम्यान ‘कमळी’ मालिकेत आणखी एक धक्कादायक ट्विस्ट आकार घेत आहे. हृषीबद्दल मनात दडवलेलं प्रेम अनिका अखेर उघड करणार आहे. ती प्रेमपत्र लिहीताना स्वतःलाच सांगते की आजचा दिवस तिच्या आयुष्यातील विशेष ठरणार आहे. “मी मिस अनिका महाजन… आज मिस्टर हृषी इनामदारला प्रपोज करणार,” असे म्हणत ती आपल्या भावना कबूल करण्यासाठी सज्ज होते. हृषीबद्दल तिचं प्रेम किती प्रामाणिक आहे हे ती व्यक्त करू पाहते, मात्र या प्रस्तावानंतर काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

प्रश्न असा की, हृषीच्या मनात कधीच अनिकासाठी प्रेमाच्या भावना नव्हत्या. त्यामुळे अनिकाच्या कबुलीला तो कशी प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दुसरीकडे कमळी आणि हृषीचं नातं अनिकाच्या प्रस्तावामुळे आणखी गुंतागुंतीचं होणार की दोघांना आपलं खरं प्रेम ओळखण्याची संधी मिळणार, हे आगामी भागच स्पष्ट करतील.

२४ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या या विशेष भागाचा प्रोमो समोर येताच प्रेक्षकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. “अनिका तू हृषीची चॉईस नाहीस”, “सौ. कमळी हृषी इनामदार हेच नाव योग्य”, “हृषी आता अनिकाला नकारच देईल” अशा कमेंट्स सोशल मीडियावर दिसून येत आहेत.

हे पण वाचा.. दुसऱ्या लग्नाची वेळ जवळ; अभिनेत्री शुभांगी सदावर्ते च्या केळवणाचा व्हिडीओ व्हायरल

‘कमळी’ मालिकेतील या रोमांचक वळणामुळे पुढील भागांबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली असून प्रेक्षक आता पुढे काय घडतं याकडे लक्ष ठेवून आहेत.

हे पण वाचा.. स्टार प्रवाहच्या ‘लक्ष्मीच्या पावलानी’ मालिकेत मोठा धक्का; मुख्य नायिकेचा एक्झिट आणि शोमध्ये नवा अध्याय सुरू

kamali serial anika hrushi love twist