ADVERTISEMENT

आम्ही मराठी बोलणार नाही.. म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना कमळी चा थेट सवाल; नव्या प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा

Kamali Marathi Language Pride Day College Promo : झी मराठी वरील कमळी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कॉलेजमध्ये घडणारा प्रसंग सध्या चर्चेत आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमळी ने विचारलेला थेट प्रश्न प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
Kamali Marathi Language Pride Day College Promo

Kamali Marathi Language Pride Day College Promo : झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेत सध्या भावनिक आणि सामाजिक विषयांना हात घालणारी कथा रंगताना दिसते आहे. Kamali ही व्यक्तिरेखा सुरुवातीपासूनच ठाम आणि मूल्यांवर विश्वास ठेवणारी दाखवली गेली आहे. सध्या ती राजनच्या सांगण्यावरून महाजन कुटुंबात अन्नपूर्णा आजीची मोठी नात म्हणून राहत आहे. तिच्या योजनेमुळेच आजीची प्रकृती सुधारली असून त्या मानसिक तणावातून पूर्णपणे सावरल्या आहेत. त्यामुळे घरातील समीकरणे बदलू लागली आहेत आणि याची जाणीव कामिनीला चांगलीच आहे.

कामिनी आणि अनिका मिळून Kamali च्या प्रत्येक पावलावर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः Kamali कॉलेजची जनरल सेक्रेटरी असल्यामुळे तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडथळे आणण्याचे डाव अधिकच वाढले आहेत. याच दरम्यान कॉलेजमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला जातो आणि इथूनच कथेला नवा ट्विस्ट मिळतो.

कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान काही विद्यार्थी उघडपणे मराठी भाषेत बोलण्यास नकार देतात. “आम्ही मराठी नाही, आम्ही मराठीत बोलणार नाही,” असे म्हणत ते आपली भूमिका मांडतात. इतकंच नव्हे तर इंग्रजी हीच आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची भाषा असल्याचे ते सांगतात. या प्रसंगात अनिका देखील इंग्रजीच्या बाजूने बोलताना दिसते, ज्यामुळे वातावरण अधिकच तापते.

अशा वेळी Kamali ची दमदार एन्ट्री होते. शांत पण ठाम आवाजात ती विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते – “तुम्ही महाराष्ट्रात राहत असताना इथल्या भाषेचा सन्मान करणं इतकं अवघड आहे का?” ती पुढे सांगते की इंग्रजी भाषा जगाशी जोडणारी असली, तरी मराठी भाषा आपल्याला आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि मुळांशी बांधून ठेवते. संत साहित्यापासून ते आधुनिक विचारांपर्यंत मराठीने समाजाला दिशा दिली आहे, हे ती विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देते.

“ज्या भूमीत राहून तुम्ही शिक्षण घेताय, जिथे काम करून उदरनिर्वाह करता, त्या भूमीच्या भाषेशी नातं ठेवण्याची गरज नाही का?” असा थेट सवाल Kamali करते. तिच्या या प्रश्नाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढळलेला दिसतो.

हे पण वाचा … स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम स्नेहलता वसईकर आता हिंदी हॉरर ‘वशीकरणं’ मालिकेत दिसणार मुख्य भूमिकेत

हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सामाजिक जाणिवांना स्पर्श करणारा विषय हाताळल्याबद्दल मालिकेच्या टीमचे कौतुक केले जात आहे. Kamali या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून भाषेचा सन्मान आणि सांस्कृतिक अभिमान यांचा संदेश प्रभावीपणे मांडला जात असल्याने मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे पण वाचा.. तारिणीचा अखेर होकार; पण ‘त्या’ एका अटीमुळे केदारसमोर नवं आव्हान

Kamali Marathi Language Pride Day College Promo