ADVERTISEMENT

मी कमळी राजन महाजन… कमळी मालिकेत अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातीची दणक्यात एन्ट्री, सगळं चित्रच बदलणार

kamali maliket mahajan gharat kamali entry : झी मराठीवरील लोकप्रिय कमळी मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये कमळीची थरारक एन्ट्री दाखवण्यात आली असून, महाजन कुटुंबातील सर्वात मोठं सत्य अखेर उघड होणार आहे.
kamali maliket mahajan gharat kamali entry

kamali maliket mahajan gharat kamali entry : झी मराठीवरील Kamali ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून, अल्पावधीतच या मालिकेने टीआरपीच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. भावनिक कथानक, नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि दमदार अभिनय यामुळे Kamali दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होताना दिसते आहे. अशातच आता मालिकेच्या आगामी भागांचा एक नवा प्रोमो समोर आला असून, या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

महाजन कुटुंबाच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारी व्यक्ती म्हणजे अन्नपूर्णा आजींची मोठी नात ‘कमळी’. काही भागांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर राजनची पहिली पत्नी आणि लेक दोघीही मृत्यूमुखी पडल्याचा समज झाला होता. या धक्क्याने अन्नपूर्णा आजी पूर्णपणे कोलमडून पडल्या असून, अद्याप त्यांची तब्येतही सावरलेली नाही. मात्र, राजनच्या मनात अजूनही एक विश्वास आहे की, त्याची मोठी मुलगी जिवंत आहे आणि ती नक्की परत येईल.

दुसरीकडे, कामिनी, रागिणी आणि अनिका या तिघी महाजनांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत. अन्नपूर्णा आजींची मोठी नात ठराविक वेळेपर्यंत परतली नाही, तर सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होणार, अशी घोषणा कामिनी आनंदात करते. हा डाव अनेक दिवसांपासून रचला जात असून, महाजन घरात सत्तेचा ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र, याच क्षणी कथानकाला कलाटणी देत Kamali ची थरारक एन्ट्री होते. ढोल-ताशांच्या गजरात, सिंहासनावर बसून कमळी समोर येते आणि संपूर्ण घर हादरवून टाकणारा खुलासा करते. “मी कमळी राजन महाजन… अन्नपूर्णा आजींची खरी नात,” असं ठामपणे सांगत ती स्वतःची ओळख करून देते. आजीला त्रास देणाऱ्यांना आता सोडणार नाही, असा इशाराही ती देते.

कमळी हीच खरी महाजनांची वारस असल्याचं सत्य समोर आल्याने कामिनी, रागिणी आणि अनिकाच्या चेहऱ्यावरील आनंद क्षणात नाहीसा होतो. अन्नपूर्णा आजींना वाचवण्यासाठीच कमळीने महाजनांच्या घरात पाऊल ठेवलं आहे का, तिचा पुढचा डाव काय असेल, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

हे पण वाचा.. Tharala Tar Mag : प्रियाचे दोन्ही आधार जेलमध्ये, सायली एकटीच सत्यासाठी उभी; रविराज–सायली नात्याला नवी दिशा

दररोज रात्री ९ वाजता झी मराठीवर प्रसारित होणारी Kamali ही मालिका या टाइम स्लॉटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. कमळीच्या या दणक्यात एन्ट्रीनंतर मालिकेची कथा आणखी वेग घेणार असल्याचं स्पष्ट आहे.

हे पण वाचा.. मला तुमच्या प्रेमाची नशा झालीये…’ लग्नांतर होऊलाच प्रेम मालिकेत नंदिनीची भावनिक कबुली, पार्थ-काव्याच्या नात्याला नवं वळण?

kamali maliket mahajan gharat kamali entry