ADVERTISEMENT

कमळी मालिकेत भावनिक क्षण! आई-लेकीची भेट की फक्त स्वप्न? प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

kamali maaliket mayleki bhet twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ‘कमळी’ आणि तिच्या आईची भेट होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच या प्रसंगामागे काहीतरी वेगळंच घडत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.
kamali maaliket mayleki bhet twist

kamali maaliket mayleki bhet twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली ‘Kamali’ सध्या कथानकातील मोठ्या वळणामुळे चर्चेत आली आहे. होळी आणि रंगपंचमीच्या उत्सवाच्या वातावरणात इनामदारांच्या घरी सगळे जण एकत्र येतात आणि याच आनंदी क्षणांमध्ये एक मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचं प्रोमोमधून दिसतं. या सगळ्या घडामोडींमुळे ‘Kamali’ मालिकेतील पुढील भागाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

मालिकेत Kamali आणि हृषी यांच्यातील वाढतं नातं अनिकाला अजिबात आवडत नाही. हृषी नेहमी Kamaliची बाजू घेतो आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत साथ देतो, यामुळे अनिकाच्या मनात असूया निर्माण झाली आहे. याच रागातून ती तिची ग्रॅनी आजी कामिनीसमोर मन मोकळं करते. आपल्या नातीला त्रास होत असल्याचं पाहून कामिनीही Kamaliला धडा शिकवायचा निर्धार करते आणि इथूनच एक मोठं षडयंत्र सुरू होतं.

रंगपंचमी साजरी करताना घरात सगळे रंगांच्या आनंदात मग्न असतात. याच वेळी कामिनी आणि अनिका मिळून Kamaliच्या डोळ्यांवर पट्टी बांधतात आणि तिला जबरदस्तीने थंडाई पाजतात. मात्र या थंडाईमध्ये भेसळ केल्यामुळे Kamaliची तब्येत बिघडते आणि ती शुद्ध हरपते. काही वेळासाठी घरात चिंता पसरते. निंगी तिला सावरण्याचा प्रयत्न करते, तर काही वेळाने Kamaliला स्वतःहून शुद्ध येते.

कामिनी आणि अनिकाचा खरा हेतू Kamaliला अन्नपूर्णा आजीसमोर अडचणीत आणण्याचा असतो. Kamali ही गौरी आणि राजनची मुलगी नाही, हे सिद्ध करण्याचा त्यांचा डाव असतो. पण परिस्थिती त्यांच्या मनासारखी घडत नाही. थंडाईच्या नशेमुळे Kamali काहीतरी वेगळीच बडबड करू लागते आणि त्यांचा सगळा प्लॅन फसतो.

दरम्यान, Kamaliची तब्येत ठीक नसल्यामुळे तिची राहण्याची व्यवस्था इनामदारांच्या घरातच केली जाते. याच वेळी हृषी तिला भेटायला येतो आणि Kamaliबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करतो. या दरम्यान गौरीही तिथे पोहोचते. कामिनीपासून वाचण्यासाठी तिने आपली ओळख बदललेली असते आणि घरातील लोक तिला ‘साधना’ या नावाने ओळखतात.

हे पण वाचा.. बाई तुझा आशीर्वाद : स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका; फ्रेश जोडीसोबत दमदार कलाकारांची फौज, प्रसारणाची तारीख जाहीर

Kamaliला शुद्ध आल्यानंतर ती आईसमोर मनातील भावना व्यक्त करते. “आई मला माफ कर… मी तुला न सांगता मुंबईला आले. तुला खूप त्रास दिला,” असे बोलताना तिच्या डोळ्यातील पश्चात्ताप स्पष्ट दिसतो. आपल्या लेकीच्या तोंडून हे शब्द ऐकून गौरीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि हा क्षण अत्यंत भावनिक बनतो.

मात्र या प्रसंगाबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. काहींच्या मते Kamaliला दिसलेला हा प्रसंग स्वप्न असू शकतो, तर काहीजण थंडाईमुळे झालेल्या नशेमुळे तिला असे भास होत असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे खरोखरच Kamali आणि तिच्या आईची भेट होते की नाही, याबद्दल सस्पेन्स कायम आहे.

हे पण वाचा..‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट! रोहिणी सांगणार हिऱ्याच्या हारामागचं खरं सत्य

kamali maaliket mayleki bhet twist

मालिकेचा हा विशेष भाग ११ मार्च रोजी प्रसारित होणार असून त्यानंतरच या प्रश्नांची खरी उत्तरे मिळणार आहेत. त्यामुळे ‘Kamali’ मालिकेचा पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.