kamali annaapurna nat parat yeanar : महाजन कुटुंबात नवा वळण घेणारे प्रसंग घडायला सज्ज आहेत. प्रेक्षकांची लाडकी मालिका Kamali आता एका मोठ्या रहस्याच्या उकलाकडे वाटचाल करत आहे. अन्नपूर्णा आजींची हरवलेली मोठी नात अखेर वाड्यात येणार असल्याचं भाकीत गुरुजींनी केल्याने सर्वच घरात आश्चर्य आणि उत्सुकता वाढली आहे.
काही वर्षांपूर्वी कामिनीने महाजन घराण्याची सर्व मालमत्ता आपल्या मुलगी अनिकाच्या नावावर मिळवण्यासाठी अनेक कपटी डावपेच रचले होते. त्याचाच एक भाग म्हणून राजनची पहिली पत्नी गौरी आणि तिची मुलगी कमळी यांना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या घटनेनंतर गौरी आणि लहानगी कमळी गावात लपून राहत होते. मात्र अन्नपूर्णा आजींच्या मनात मात्र एक ठाम विश्वास होता — ‘माझी मोठी नात एक दिवस नक्की घरी परत येईल.’
वेळ जसजसा पुढे सरकत होता तसतसं कामिनीचं कारस्थान यशस्वी होण्याच्या मार्गावर आलं. अन्नपूर्णा आजींनी दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीत जर नात परत आली नाही तर संपूर्ण प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर जाणार होतं. म्हणूनच आजी आपल्या मोठ्या नातीच्या शोधात आक्रमक झाल्या होत्या. राजनने सुद्धा कोल्हापुरात आपल्या पहिल्या पत्नीचा शोध सुरू केला होता. पण तिथेही कामिनी गुंडांसह उपस्थित होती आणि गौरी व तिच्या मुलीचा जीव घ्यायचे आदेश दिले होते.
या सगळ्या गोंधळात एक मोठं गुपित मात्र अद्याप घरातील कोणालाही माहीत नाही — महाजन घराण्याची मोठी नात म्हणजे दुसरी कोणी नसून ‘कमळी’च आहे. ही गोष्ट फक्त आजोबांनाच ठाऊक आहे. आणि आता गुरुजींच्या भाकीतीनंतर घरात नव्या घटनांची मालिका सुरू झाली आहे. गुरुजींनी अन्नपूर्णा आजींना सांगितलं — “आज दुपारपर्यंत तुमची मोठी नात घरी येईल.”
ही बातमी ऐकताच आजींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी नातीसाठी खास जेवण बनवण्याची तयारी केली. पण त्याच क्षणी कामिनीने पुन्हा एक क्रूर डाव रचला. तिने कामगाराला सांगून खिरीत विष मिसळण्याचं आदेश दिलं. अन्नपूर्णा आजींचा आनंद आता मोठ्या संकटात अडकणार आहे का?
हे पण वाचा.. बिग बॉस १९ मधील नवीन वाइल्ड कार्ड मालती चहरची बालपणापासूनचे संघर्ष आणि धाडस
कमळी घरात परत येईल का? अन्नपूर्णा तिला ओळखेल का? आणि कामिनीच्या या विषारी कटाचा बळी कोण ठरणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या १० ऑक्टोबरच्या विशेष भागात मिळणार आहेत.
या थरारक प्रसंगांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. Kamali मालिकेतील आगामी भाग घराघरात चर्चेचा विषय ठरणार आहे, हे नक्की!
हे पण वाचा.. मृण्मयी देशपांडे पुन्हा मालिकांमध्ये दिसणार? अभिनेत्रीचा स्पष्ट खुलासा, म्हणाली.. Mrunmayee Deshpande









