ADVERTISEMENT

नवसाची गौराई माझी! रोहित राऊत-जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) यांनी नागपूरच्या घरी केलं महालक्ष्मी पूजन, १५० वर्षांची परंपरा जपली

गायक रोहित राऊत आणि गायिका Juilee Joglekar दरवर्षी नागपूरच्या घरी गौराई-महालक्ष्मी पूजन करतात. यावर्षी त्यांनी १५० वर्षांची परंपरा जपत खास व्हिडीओ शेअर केला असून, चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.
Juilee Joglekar

गणेशोत्सव हा प्रत्येक मराठी मनासाठी केवळ उत्सव नसून तो एक भावनिक नातं जपणारा पर्व आहे. गायक रोहित राऊत आणि लोकप्रिय गायिका Juilee Joglekar यांच्यासाठीही हा सण विशेष महत्त्वाचा ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही जोडी नागपूरच्या घरी पोहोचली आणि घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने गौराई-महालक्ष्मीचं पूजन केल.

सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून रोहित आणि Juilee Joglekar यांची ओळख घराघरात पोहोचली. त्या काळातली त्यांची मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि २०२२ मध्ये या गोड जोडीने लग्नगाठ बांधली. लग्नानंतरही दोघांचे चाहते त्यांच्या गाण्यांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहतात.

या वर्षीच्या गौराई आगमनाचा व्हिडीओ जुईलीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पारंपरिक पूजा, नैवेद्य, भजनांचा कार्यक्रम आणि आनंदी वातावरण या सर्वांची सुंदर झलक तिच्या पोस्टमध्ये पाहायला मिळते. खास बाब म्हणजे या सोहळ्याची परंपरा तब्बल १५० वर्षांची आहे. या परंपरेत दरवर्षी नवसाच्या गौराईचं पूजन होतं आणि राऊत-जोगळेकर कुटुंब ही नाळ आजही तितक्याच श्रद्धेने जपत आहे.

पोस्टसोबत Juilee Joglekar ने लिहिलंय, “आमच्या नागपूरच्या घरी १००-१५० वर्षांहून अधिक परंपरा असलेला गोड सोहळा… प्रत्येक वर्षी न चुकता आम्ही गौराई-महालक्ष्मीचं पूजन करतो. यंदाचं पूजन खास ठरलं कारण कुटुंबासोबत मित्रमंडळींनाही मिळून गानसेवेचं भाग्य लाभलं.”

हा व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला. “फारच सुंदर परंपरा”, “तुमच्या गौराईला आणि बाप्पाला आमचा नमस्कार”, “परंपरा जपणारे कलाकार खूपच सुंदर” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटल्या.

हे पण वाचा.. “तिला मारा, तिचे कपडे काढा…” – Megha Ghadge ने इंडस्ट्रीतील अफेयरच्या अफवांवरून दोन अभिनेत्रींनी दिलेला त्रासदायक अनुभव सांगितला

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर रोहित राऊतने ‘नखरेवाली’, ‘मित्रा’, ‘नाच गो बया’, ‘प्रेमाचा गुलकंद’ यांसारखी गाणी आपल्या दमदार आवाजात गाऊन प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तर Juilee Joglekar ची ‘कोकणपरी’, ‘सखे गं झाले मी साजणाची’ ही गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

गौरी-गणपतीचा हा सोहळा रोहित-जुईलीसाठी केवळ सण नसून परंपरा, संगीत आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे. या व्हिडीओमधून त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आधुनिकतेसोबत परंपरेचं नातं कसं जपावं.

हे पण वाचा.. बाप्पाला निरोप देताना भावूक झाली Shreya Bugde; सोशल मीडियावर शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Juilee Joglekar इंस्टाग्राम पोस्ट..