ADVERTISEMENT

शो मस्ट गो ऑन…? Jui Gadkari ने शेअर केला पूर्णा आजीबरोबरचा शेवटचा व्हिडीओ; भावनिक पोस्टने भारावले चाहते

"ठरलं तर मग" मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी हिने ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (पूर्णा आजी) यांच्या निधनानंतर सेटवरील त्यांचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला. या पोस्टमध्ये तिने व्यक्त केलेल्या भावनांनी चाहते डोळ्यांत पाणी आणले आहे.
Jui Gadkari

मराठी मालिकांच्या विश्वात एक हळवं दुःख दाटून आलं आहे. “ठरलं तर मग” मालिकेत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या ६९व्या वर्षी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांपासून ते सहकलाकारांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहिली.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रेक्षकांच्या आवडत्या पात्रांपैकी एक म्हणजे “पूर्णा आजी“. हे पात्र इतकं जिव्हाळ्याचं झालं होतं की, मालिकेबाहेर देखील तिची उणीव जाणवणार आहे. “पूर्णा आजी… आम्ही तुला कधीच विसरू शकणार नाही, तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही,” अशा भावना प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिचं आणि पूर्णा आजीचं ऑफस्क्रीन नातंही विशेष होतं. सेटवर दोघी नेहमी एकत्र वेळ घालवत, गप्पा मारत, एकत्र जेवत आणि फोटो-व्हिडीओ शेअर करत असत. मालिकेतील “आजी-नात” नात्याप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही दोघींच्या नात्यात एक गोड आपुलकी होती.

मात्र, ज्योती चांदेकरांच्या अचानक झालेल्या निधनाने Jui Gadkari प्रचंड व्यथित झाली आहे. तिने आपल्या भावना सोशल मीडियावर मांडताना लिहिलं – “आजी, तू फसवलंस… तू परत आलीच नाहीस…” तिच्या या ओळींनी अनेक चाहते आणि सहकलाकारांच्या डोळ्यांत अश्रू आणले.

याचदरम्यान, जुईने पूर्णा आजीबरोबर सेटवर शूटिंगदरम्यान काढलेला शेवटचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला. हा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’वर गोकुळाष्टमी निमित्त आयोजित विशेष महासंगम भागाच्या चित्रीकरणादरम्यानचा होता. दोघीही रात्री सेटवर एकत्र बसल्या होत्या आणि तोच क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. हा व्हिडीओ शेअर करताना Jui Gadkari ने लिहिलं – “आम्हा दोघींचा सेटवरील शेवटचा व्हिडीओ… महासंगमच्या शूटिंगदरम्यान घेतलेला आहे.”

यापुढे आणखी एका पोस्टमध्ये तिने “शो मस्ट गो ऑन…” या वाक्यावर प्रश्न उपस्थित केला. Jui Gadkari म्हणते – “हे वाक्य किती सहज बोलतात सगळे! पण खरंच इतकं सोपं असतं का पुढे जाणं? रोजच्या आयुष्यात जेवणाच्या टेबलवर गोड खाण्यावरून होणारी भांडणं आता कधीच होणार नाहीत…” या भावनिक ओळींनी तिच्या पूर्णा आजीबद्दलच्या आपुलकीचं प्रतिबिंब स्पष्ट होतं.

ज्योती चांदेकरांच्या अंतिम संस्कारासाठी Jui Gadkari, निर्माती सुचित्रा बांदेकर, अभिनेता अमित भानुशाली यांच्यासह मालिकेतील अनेक कलाकार पुण्यात उपस्थित राहिले होते. या प्रसंगीही कलाकारांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

हे पण वाचा.. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार? निर्माती Suchitra Bandekar यांचं भावनिक वक्तव्य

निर्माती सुचित्रा बांदेकर यांनीही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या – “‘ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी हे दुःख खूप मोठं आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी आम्हाला काही दिवस लागतील. पूर्णा आजीला विसरणं कधीच शक्य होणार नाही.”

दरम्यान, मालिकेच्या चाहत्यांनी देखील चॅनेल आणि निर्मात्यांना एक विशेष विनंती केली आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं आहे – “कृपया पूर्णा आजीची भूमिका दुसऱ्या कोणाकडून करू नका. आम्ही त्यांना खूप मिस करत आहोत.”

पूर्णा आजीचं पात्र इतकं लोकप्रिय झालं होतं की, तिच्या जागी दुसरा चेहरा प्रेक्षकांना स्वीकारणं कठीण आहे. आज जरी त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांच्या अभिनयाने दिलेल्या आठवणी आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेलं आपुलकीचं स्थान कायम स्मरणात राहील.

हे पण वाचा.. आश्रम केस पुन्हा उघडणार! महिपतला मिळाला नवा वकील सायलीच्या भूतकाळाने खळबळ Tharala Tar Mag 20 Aug

अभिनेत्री Jui Gadkari साठी मात्र हा धक्का अजूनही पचवणं कठीण ठरत आहे. तिच्या शेअर केलेल्या व्हिडीओंनी आणि भावनिक पोस्टने हे स्पष्ट दिसतंय. प्रेक्षकांसाठी “पूर्णा आजी” कधीही विसरता न येणारं पात्र ठरेल, तर कलाकारांसाठी त्या कायमचं आधारवड बनून राहतील.

Jui Gadkari इंस्टाग्राम पोस्ट..