ADVERTISEMENT

Jui Gadkari खऱ्या आयुष्यात किती ‘गुंडी’? ऑनस्क्रीन मैत्रीण दिशाची धमाल पोलखोल!

‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी जुई गडकरी सेटवर खऱ्या आयुष्यात कशी आहे, हे तिची ऑनस्क्रीन मैत्रीण दिशा दानडेने उघड केलं.
Jui Gadkari

‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी Jui Gadkari सेटवर खऱ्या आयुष्यात कशी आहे, हे तिची ऑनस्क्रीन मैत्रीण दिशा दानडेने उघड केलं.

जुई गडकरीबद्दल ऑनस्क्रीन मैत्रीण दिशा दानडेची पोलखोल! ‘ठरलं तर मग’च्या सेटवर खऱ्या आयुष्यात ती कशी असते?

‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली आहे. ऑनस्क्रीन तिची साधी, सोज्वळ आणि संयमी छबी असली तरी, सेटवर तिचं खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्व यापेक्षा वेगळं आहे, हे तिची ऑनस्क्रीन मैत्रीण दिशा दानडेने सांगितलं आहे.

अलिकडेच, Jui Gadkari आणि दिशा दानडे यांनी ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सेटवरील अनेक गमतीजमती उलगडल्या. कुसुमची भूमिका साकारणारी दिशा गमतीत म्हणाली, “जुई गुंडी आहे, तुम्हाला हे माहित नाहीये! मी मालिकेत कुसुमताई आहे, पण खऱ्या आयुष्यात जुई माझ्यापेक्षा मोठी आहे. तरीसुद्धा ती मला ताई म्हणू देत नाही. सेटवर तिची ऊर्जा वेगळीच असते.”

हे पण वाचा..Rinku Rajguru ची ‘डेट’ चर्चेत! खास वेळ काढत शेअर केले फोटो..कोणाला करतेय डेट सोशल मिडियावर रंगली चर्चा

Jui Gadkari च्या नाजूक दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे ती किती खंबीर आहे, याबद्दल दिशा पुढे म्हणते, “तिची प्रकृती बरी नसतानाही तिने सुट्टी न घेता चित्रीकरण केलं. हे पाहून मला तिचा खूप अभिमान वाटला. सीनदरम्यान आम्ही एकत्र इतकी मजा करतो की तिच्या अनुपस्थितीत मला सेटवर खूप कंटाळा येतो.”

Jui Gadkari देखील दिशाबद्दल बोलताना म्हणाली, “ही माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, त्यामुळे मी म्हणेन ते हिला ऐकावं लागतं!” या दोघींच्या या मजेशीर टोमण्यांनी चाहत्यांचंही मनोरंजन केलं आहे.

सध्या मालिकेत कोर्ट ड्रामा रंगतदार टप्प्यावर आहे. Jui Gadkari या कथानकाच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ‘ठरलं तर मग’ च्या पुढील भागात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.