jui gadkari funny reply on marriage question : स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेत साकारणाऱ्या ‘सायली’ या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची केमिस्ट्री, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची मजेशीर गोष्ट, तसेच कोर्टरूम ड्रामा यामुळे ही मालिका कायम टीआरपीच्या यादीत अव्वल ठरते.
पण यावेळी जुई मालिकेमुळे नव्हे, तर तिच्या खऱ्या आयुष्याशी संबंधित एका प्रश्नामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी “आस्क मी” सेशन ठेवले होते. या दरम्यान एका चाहत्याने तिला थेट विचारलं, “ताई, तुझं लग्न ठरलं का?” यावर जुईने खुमासदार उत्तर देत फक्त दोन शब्द उच्चारले – “ठरलं तर मग!”
तिचं हे उत्तर ऐकून चाहते हसून लोटपोट झाले आणि सोशल मीडियावर या उत्तराची जोरदार चर्चा सुरू झाली. तिच्या या प्रत्युत्तरामुळे चाहते आनंदी तर झालेच, पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, खरंच जुईच्या आयुष्यात एखादं खास नातं सुरू झालंय का?
जुई गडकरी पूर्वीही लग्नाविषयी बोलताना प्रामाणिकपणे म्हणाली होती की, तिला योग्य जोडीदार मिळावा अशीच अपेक्षा आहे. ती ३७ वर्षांची असली तरी अजूनही तिचा ‘तो’ साथीदार शोध सुरू आहे. त्यामुळे या उत्तरामागे खरोखर काही संकेत आहेत का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय.
मालिकेतील तिच्या सहकलाकारांसोबतचे किस्से, सेटवरील मजा आणि वैयक्तिक आयुष्यातले अनुभव ती नेहमी चाहत्यांशी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच मालिकेत आजींची भूमिका करणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्या निधनाने ती फार भावुक झाली होती. त्यावेळी जुईने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, “पूर्णा आजींना माझं लग्न बघायची खूप इच्छा होती, पण ती अपूर्ण राहिली.”
हे पण वाचा.. “‘लग्न करणार का?’…फोनवर रात्री ११ वाजता केल प्रपोज; किशोरी शहाणे यांनी सांगितली त्यांच्या लव्हस्टोरीची फिल्मी आठवण
जुईने यापूर्वी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. नंतर ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली होती. काही काळ गंभीर आजारामुळे तिला अभिनयापासून दूर रहावं लागलं, मात्र ‘ठरलं तर मग’ मधून तिने दमदार पुनरागमन केलं.
आज जुई गडकरी पुन्हा एकदा चाहत्यांच्या गप्पांचा विषय ठरली आहे. तिचं उत्तर मजेशीर असलं तरी त्यामागे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा संकेत आहे का, हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
हे पण वाचा.. “‘ट्रोलिंग आधी स्वतःपासून सुरू करा’; प्रथमेश परब पत्नी क्षितीजा घोसाळकरची स्पष्ट प्रतिक्रिया”









