मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांच्या चाहत्यांसाठी १६ ऑगस्टचा दिवस अत्यंत दुःखद ठरला. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे पुण्यात निधन झाले आणि मराठी कलाक्षेत्राने आपली एक मोलाची कलावंत गमावली. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळातील काही आजारांनी त्या त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली असून, त्यापैकी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
प्रेक्षकांच्या मनात “पूर्णा आजी” म्हणून घराघरात पोहोचलेल्या ज्योती चांदेकरांच्या जाण्याने मालिकाविश्व शोकाकुल झाले आहे. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या निधनानंतर या मालिकेतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री Jui Gadkari मात्र विशेष भावनिक झाली. तिने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून पूर्णा आजींबरोबरच्या आठवणी सांगितल्या आणि ती वाचून चाहत्यांचेही डोळे पाणावले.
Jui Gadkari चा पहिला अनुभव
Jui Gadkari ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, तिची आणि ज्योती चांदेकरांची पहिली भेट २०१० मध्ये ‘बाजीराव मस्तानी’ मालिकेच्या सेटवर झाली होती. एकाच मेकअप रूममध्ये बसताना त्यांच्या साध्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वाचा तिला पहिल्यापासूनच प्रभाव पडला. “आळवणीतही एवढं सुंदर दिसणं शक्य आहे का?” असा प्रश्न जुईला पडला होता.
यानंतर २०२२ मध्ये दोघी पुन्हा ‘ठरलं तर मग’च्या निमित्ताने भेटल्या. या मालिकेने त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. सुरुवातीला “ज्योती ताई” ते “आजी” आणि शेवटी “माझी म्हातारी” अशा प्रेमळ हाकेतून त्यांच्यातली जवळीक स्पष्ट झाली होती.
पूर्णा आजींचे खास गुण
Jui Gadkari ने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, ज्योती चांदेकर नेहमीच सजलेली, नटलेली दिसायची. त्यांना सुंदर साड्या, दागिने, नवनवीन नेलपॉलिश, कॉस्मेटिक्सची आवड होती. जुईला स्वतःला आजी-आजोबा खूप आवडायचे. तिची स्वतःची आजी २०१५ मध्ये गेल्यानंतर तिला पूर्णा आजीमध्ये पुन्हा तिच्या आजीचा स्पर्श जाणवला.
त्यांचा सहवास तिच्यासाठी अगदी घरगुती होता. “मी सतत तिच्या मांडीवर बसायचे, तिला मिठ्या मारायचे, तिच्या हाताचा उबदार स्पर्श अनुभवायचे,” असे तिने लिहिले. “आलं माझं मांजराचं पिल्लू” अशी आजीची लाडकी हाक जुईला कायम आठवेल, असे तिने नमूद केले.
सेटवरील आठवणी
पूर्णा आजींचा खाऊचा डबा हा सेटवरील सगळ्यांसाठी आकर्षण होता. चिप्स, चकल्या, शेव, गुलाबजाम असे पदार्थ त्या आवर्जून आणायच्या. कधी चोरून गोड खायच्या आणि पकडल्या जायच्या. पुण्यावरून आल्यावर खास करून सर्वांसाठी क्रीमरोल आणण्याची त्यांची सवय होती.
त्यांच्या हट्टी स्वभावाच्याही आठवणी जुईने सांगितल्या. कधी रागवल्यावर लहान मुलांसारख्या रडायच्या, पण अभिनयाच्या बाबतीत मात्र अप्रतिम कामगिरी करायच्या. “संवाद कसा ही असो, तो त्यांच्या आवाजात आणि भावनेत जीव ओतून सादर होत असे,” असे Jui Gadkari ने लिहिले.
हे पण वाचा.. “त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो” – Akshar Kothari ने सांगितली आदेश बांदेकरांसोबतची खास आठवण
भावनिक क्षण
एका वेळी जुईने त्यांना जरा जास्तच ओरडले होते. त्यावर पूर्णा आजी शांतपणे म्हणाल्या, “मला पंडितांकडे जायचंय.” हे ऐकून जुई सुन्न झाली. “एखाद्याच्या आयुष्यात किती एकटेपणा असतो, हे त्या क्षणी समजलं,” असे तिने सांगितले.
जुईने हेही उघड केले की, तिला स्वतःच्या लग्नाला पूर्णा आजींना बोलवायचे होते. पण तो दिवस तिच्यासाठी अधूराच राहिला. “तू ठणठणीत बरी होऊन माझ्या लग्नाला येणार असं म्हणालीस… पण आता सगळं राहून गेलं गं,” असे ती पोस्टमध्ये म्हणते.
अखेरचा निरोप
जुई गडकरीने आपल्या पोस्टमध्ये शेवटी लिहिले, “याही वेळेला वाटलं होतं तू परत येशील… पण तुझी औषधांच्या वासांनी भरलेली खोली, तुझे दागिने, तुझा परफ्युम हे सगळं आता कधीच दिसणार नाही. तू म्हणाली होतीस, पुण्याला जाऊन येते… पण या वेळी परत आलीस नाहीस.”
स्मशानभूमीतील आजींच्या शांत चेहऱ्याचे वर्णन करताना जुई म्हणाली, “आता तरी पंडितांबरोबर शांत राहा… सुखी राहा. ॐ शांती.”
हे पण वाचा.. अभिनेता Adhokshaj Karhade ने व्यक्त केल्या भावना; शुभांगी गोखलेंचं खास गिफ्ट ठरलं ‘राखीपोर्णिमेची आठवण’
ज्योती चांदेकरांची कारकीर्द
ज्योती चांदेकर यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांना “बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘गुरु’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ असे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाची साक्ष देतात.
त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या आठवणी आणि कलाकृती कायम चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील.









