jui gadkari bold scenes babat mat : मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री Jui Gadkari पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोज्वळ आणि संस्कारी भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या जुईने बोल्ड सीनबाबत घेतलेली ठाम भूमिका अनेकांना भावली आहे. अभिनेत्री असूनही तिनं स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे ठरवून दिल्या आहेत.
जुईने नुकत्याच दिलेल्या एका खास मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, “तुला कोणत्या प्रकारचं काम करायला आवडत नाही?” यावर ती न घाबरता म्हणाली, “मला बोल्ड कन्टेंटमध्ये काम करायचं नाही. मी तशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अजिबात कम्फर्टेबल नाही. माझे आई-बाबा, प्रेक्षक यांच्यामध्ये माझ्याबद्दल जो आदर आहे, तो मी कधीही गमवू इच्छित नाही. कलाकार म्हणून सगळंच करावं लागतं, असं मी मानत नाही. अभिनय सिद्ध करण्यासाठी अंगप्रदर्शन आवश्यक नाही.”
तिनं पुढे सांगितलं की, “अनेकदा काही लोकांचा समज असतो की बोल्ड सीन केल्यानेच तुमचं टॅलेंट दिसतं. पण मला वाटतं खरा कलाकार तोच जो कोणत्याही मर्यादा ओलांडता प्रभावी अभिनय करू शकतो. त्यामुळे मी असं काम कधीच करणार नाही, असा माझा ठाम निर्णय आहे.” तिचं हे उत्तर ऐकून अनेक प्रेक्षक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं आहे.
सध्या जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायलीची भूमिका साकारत आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीत कायम अव्वल राहते आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत आहे. जुईच्या समोर या मालिकेत अमित भानुशाली, प्रिया तेंडोलकर, मोनिका दाभाडे आणि प्रतिक सुरेश यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.
जुई गडकरी केवळ मालिकांमधील भूमिकांसाठीच नव्हे तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही सक्रिय असून वैयक्तिक आयुष्यातील क्षण चाहत्यांपर्यंत पोहोचवते. आता बोल्ड सीनबाबत तिने घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा तिच्या विचारांची प्रामाणिकता समोर आली आहे. मनोरंजन विश्वात बोल्डनेसचं वाढतं प्रमाण पाहता जुई गडकरीचा हा ठाम निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हे पण वाचा.. श्रुती मराठेच्या ‘राधा ही बावरी’ मालिकेतील ट्रोलिंगचा अनुभव
तिच्या या निर्णयामुळे ती फक्त एक अभिनेत्री न राहता स्वतःचं व्यक्तिमत्व ठामपणे मांडणारी महिला म्हणूनही चाहत्यांच्या नजरेत आणखी उंचावली आहे. मराठी मालिकांमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीची सोज्वळ छबी आणि स्पष्ट विचार हीच तिची खरी ताकद आहे.
हे पण वाचा.. ‘करवा चौथ’ला रॉकी जयस्वालचा खास अंदाज; पत्नी हिना खानच्या पाया पडत व्यक्त केलं प्रेम









