ADVERTISEMENT

टाईमपास’ फेम जयेश चव्हाणचं स्वप्न साकार! नवीन घरात केली गृहप्रवेश पूजा; नेमप्लेटने वेधलं सगळ्यांचं लक्ष

jayesh chavan first home celebration : ‘टाईमपास’ सिनेमातील दादूस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता जयेश चव्हाण आता स्वतःच्या नव्या घरात दाखल झाला आहे. पनवेलजवळील कोणार्क रिव्हर सिटीमध्ये त्याने घेतलेल्या या घराची झलक आणि हटके नेमप्लेट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
jayesh chavan first home celebration

jayesh chavan first home celebration : मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि गुणी अभिनेता जयेश चव्हाण सध्या आपल्या नव्या घरामुळे चर्चेत आला आहे. ‘टाईमपास’ या सुपरहिट सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा जयेश, म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या दादूसने, अखेर आपल्या स्वप्नातील घराचं स्वप्न साकार केलं आहे. पनवेलजवळील कोणार्क रिव्हर सिटी परिसरात त्याने आपली नवी वास्तू घेतली असून, या आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर खास पद्धतीने चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

जयेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गृहप्रवेशाच्या पूजेची झलक पाहायला मिळते. हसऱ्या चेहऱ्याने पूजा करताना आणि आपल्या नव्या घराच्या दारातून पाऊल टाकताना जयेशच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट जाणवतो. त्याच्यासाठी हा क्षण केवळ एक घर विकत घेण्याचा नव्हे, तर स्वप्न साकार करण्याचा आहे.

“ही फक्त वास्तू नाही, आमच्या स्वप्नांचा पहिला Take आहे,” असं सांगत जयेश चव्हाणने आपल्या पोस्टला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्यासोबतच त्याने ‘Dream Home’, ‘नवीन घर’ असे हॅशटॅग वापरत आपली आनंदाची भावना व्यक्त केली.

जयेशच्या नव्या घराची नेमप्लेटही तितकीच आकर्षक ठरली आहे. साधी पण हटके अशी ही नेमप्लेट वलॅप बोर्डच्या स्टाईलमध्ये बनवण्यात आली आहे. यावर अभिनेत्याचं नाव, सत्तानंबर आणि त्याच्या स्टुडिओचं नाव विशेषरूपाने लिहिलं आहे. चाहत्यांनी या अनोख्या कल्पनेचं कौतुक करत जयेशचं अभिनंदन केलं आहे.

अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घराच्या मुख्य दरवाज्यापासून प्रशस्त हॉल, किचनपर्यंत सर्व काही पाहायला मिळतं. या घराची सजावट साधी पण रुबाबदार दिसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टखाली नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “नव्या घरासाठी खूप शुभेच्छा”, “सुखाचं नवं ठिकाण”, “जयेश अभिनंदन” अशा कमेंट्सनी त्याचा पोस्टचा कमेंट सेक्शन भरून गेला आहे.

हे पण वाचा.. माधवी निमकरची कोकण सफर; नारळ-सुपारीच्या बागेतून चालत पोहोचली समुद्रकिनाऱ्यावर, म्हणाली “हेच खरं सुख!”

‘टाईमपास’ सिनेमातील मलेरिया दादूसची भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारा जयेश आता आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेलं हे घर त्याच्यासाठी आयुष्यातील एक मोठं यश ठरलं आहे. चाहत्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात, जयेश चव्हाणच्या आयुष्यातील हा “पहिला Take” खरंच संस्मरणीय ठरत आहे.

हे पण वाचा.. अभिनेत्री दीप्ती केतकरचा खुलासा: “नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत नाही कारण…” – ट्रोलिंगवरही दिलं स्पष्ट उत्तर

jayesh chavan first home celebration