ADVERTISEMENT

भर मांडवात रोमँटिक क्षण; लग्नानंतर मराठी अभिनेत्याची खास पोस्ट – “तू, मी आणि आयुष्यभर…”

Jay Dudhane post after marriage goes viral : मराठी कलाविश्वात लग्नाचा सिझन सुरू असताना जय दुधाने यानेही हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे. पारंपरिक थाटात पार पडलेल्या या विवाहाचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jay Dudhane post after marriage goes viral

Jay Dudhane post after marriage goes viral : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाचा आनंदी माहोल पाहायला मिळतो आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत असून चाहत्यांमध्येही याची चांगलीच चर्चा रंगते आहे. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी-सोहम बांदेकर आणि तेजस्विनी लोणारी यांच्यानंतर आता JayDudhane यानेही आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेल्या जय दुधाणेने २४ डिसेंबर रोजी त्याची दीर्घकाळची मैत्रीण हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधली.

कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. कोणताही गाजावाजा न करता, साधेपणात आणि पारंपरिक पद्धतीने जय आणि हर्षलाने सात फेरे घेतले. लग्नानंतर JayDudhane याने सोशल मीडियावर काही खास क्षण शेअर करत चाहत्यांशी आनंद व्यक्त केला. या फोटोंमध्ये जयचा पारंपरिक शेरवानी आणि फेट्यातील राजबिंडा लूक लक्ष वेधून घेतो, तर हर्षला पाटील पिवळ्या रंगाच्या साडीत अत्यंत सुंदर दिसत आहे.

लग्नातील सर्वात खास क्षण म्हणजे जयने भर मांडवातच पत्नी हर्षलाला उचलून घेतलेला तो भावूक प्रसंग. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोंसोबत JayDudhane याने “तू, मी आणि आयुष्यभराचं प्रेम…” असं भावनिक कॅप्शन दिलं आहे, ज्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

JayDudhane याच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी ३’मधील त्याचा प्रवास प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला आहे. या शोमध्ये तो उपविजेता ठरला होता. त्याआधी ‘MTV स्प्लिट्सविला १३’चा विजेता म्हणूनही त्याने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रातही आपली छाप सोडली. दुसरीकडे, जयची पत्नी हर्षला पाटील ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर म्हणून ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते आणि अखेर त्यांनी नात्याला अधिकृत स्वरूप दिलं.

हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये सत्ताबदलाची नांदी? स्वानंदी-मल्लिका आमनेसामने!

JayDudhane आणि हर्षला पाटील यांच्या या नव्या प्रवासाला चाहते, सहकलाकार आणि सोशल मीडिया युजर्सकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी कलाविश्वात आणखी एका आनंदाच्या बातमीची भर पडली असून जय-हर्षलाची जोडी पुढील आयुष्यासाठी सज्ज झाली आहे.

हे पण वाचा.. विग नाही, माझेच केस! धनश्री काडगावरने केसांबाबतचा गैरसमज केला दूर

Jay Dudhane post after marriage goes viral