jay dudhane arrested in fraud case : बिग बॉस मराठी ३ चा उपविजेता आणि लोकप्रिय चेहरा Jay Dudhane सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. ठाणे पोलिसांनी त्याला पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली असून, ही कारवाई थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. विशेष म्हणजे, जय दुधाणे याचं लग्न होऊन अवघे ११ दिवस झाले असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, Jay Dudhane याच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे काही दुकानं व व्यावसायिक जागा वेगवेगळ्या व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमुळे अनेक खरेदीदारांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची रक्कम सुमारे पाच कोटी रुपये असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, जय दुधाणेच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे.
Jay Dudhane हा केवळ रिअॅलिटी शोमधील चेहराच नाही, तर तो एक फिटनेस ट्रेनर, खेळाडू, मॉडेल आणि अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. ठाणे शहरात त्याचा जिम व्यवसाय असून, याच व्यवसायाच्या माध्यमातून संबंधित व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिस अधिक तपशील गोळा करत असून, पुढील तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजे २४ डिसेंबर २०२५ रोजी Jay Dudhane याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. ठाण्यात पार पडलेला हा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र, लग्नाच्या आनंदावर अचानक पोलिस कारवाईचं सावट आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
जय दुधाणे प्रथम ‘स्प्लिट्सव्हिला १३’ या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आला होता. या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. त्यानंतर Bigg Boss Marathi 3 मध्ये सहभाग घेत त्याने उपविजेतेपद मिळवलं. अभिनय क्षेत्रातही त्याने पाऊल ठेवलं असून ‘गडद अंधार’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत.
हे पण वाचा.. ठरलं तर मग मध्ये सुभेदारांच्या घरात वादळ! प्रियाचा संताप, सचिनमुळे सायली-अर्जुनच्या नात्यावर ताण
सध्या Jay Dudhane वर नेमके कोणते कलम लावण्यात आले आहेत, या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती किती आहे आणि आणखी कोणाची यात सहभाग आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा.. नवीन वर्षात संतोष जुवेकर यांनी घेतली नवी थार रॉक्स; सोशल मीडियावर शेअर केला आनंद







