ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा मराठी मुलगा म्हणून प्रणित मोरेसाठी जान्हवी किल्लेकरचा मोठा सपोर्ट म्हणाली..

janhavi killekar pranit more support : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने Bigg Boss 19 च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या प्रणित मोरेसाठी सोशल मीडियावर प्रेक्षकांना जोरदार मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
janhavi killekar pranit more support

janhavi killekar pranit more support : हिंदी रियालिटी शो Bigg Boss 19 चा ग्रँड फिनाले येत्या ७ डिसेंबरला पार पडणार आहे. यंदाच्या पर्वात टॉप ५ स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले असून प्रेक्षकांचे लक्ष कोण ट्रॉफी उंचावणार यावर लागलं आहे. या निर्णायक टप्प्यावर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना प्रोत्साहन देत आहेत, आणि अशातच मराठी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

बिग बॉस मराठी ५ च्या प्रसिद्ध स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (janhavi killekar) ने प्रणित मोरेसाठी सोशल मीडियावर मोठा सपोर्ट दिला आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तीने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये तिने प्रणितला समर्थन देत प्रेक्षकांना मतदानासाठी आवाहन केलं आहे. जान्हवी म्हणाली, “नमस्कार मंडळी, हिंदी बिग बॉस १९ मध्ये आपल्या महाराष्ट्राचा मराठी मुलगा अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता आपलं काम सुरू आहे. प्रणितला ट्रॉफीपर्यंत पोहोचवणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे.”

जान्हवीच्या या व्हिडीओत तिने महाराष्ट्रातील लोकांना आवाहन केलं की, आता हीच वेळ आहे आपल्या मराठी माणसाची ताकद दाखवण्याची. तिने म्हटलं, “सगळ्यांनी मिळून खूप सारा वोट करूया आणि प्रणित मोरेला हिंदी बिग बॉस १९ चा विजेता बनवूया.” या संदेशामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लहर पसरली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्रणितच्या चाहत्यांनी जान्हवीच्या पाठिंब्याचे कौतुक केले असून त्यांच्या आवाहनाने पुढील मतदानात मराठी चाहत्यांची मोठी भूमिका दिसण्याची अपेक्षा आहे. फिनाले जवळ आल्यानंतर, या स्पर्धकांच्या टॉप ५ मध्ये स्थान कायम ठेवण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रेक्षकांचे मतदान निर्णायक ठरणार आहे.

हे पण वाचा.. मग दृष्ट कोणी लावली? जान्हवी किल्लेकरचा सवाल आजारपणानंतरचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

अशा प्रकारे जान्हवी किल्लेकरने प्रणित मोरेसाठी दिलेला हा भावनिक आणि प्रेरणादायक सपोर्ट यंदा बिग बॉस १९ च्या शेवटच्या पर्वाला अधिक रोमांचक बनवणार आहे. मराठी चाहत्यांसाठी हा क्षण खास ठरणार असून, प्रणितच्या यशासाठी आता सर्वांचे एकत्रित मतदान निर्णायक ठरणार आहे.

हे पण वाचा.. जिवलगा नंतर पुन्हा एकत्र? अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशीच्या व्हिडीओवर चर्चा रंगली

janhavi killekar pranit more support