ADVERTISEMENT

मग दृष्ट कोणी लावली? जान्हवी किल्लेकरचा सवाल आजारपणानंतरचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

jahnavi killekar drusht question video : आजारपणातून सावरल्यानंतर जान्हवी किल्लेकर ने शेअर केलेल्या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांनी ‘छोटा पुढारी’पासून ‘CID’पर्यंत भन्नाट कमेंट्स केल्या.
jahnavi killekar drusht question video

jahnavi killekar drusht question video : बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडिया स्टार Jahnavi Killekar पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी आजारी पडल्याने तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांच्या लग्नात ती करवली म्हणून सतत धावपळ करताना दिसली होती. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने तिने हॉस्पिटलमधून फोटो शेअर करत ‘दृष्ट लागली’ असं लिहिलं होतं. आता तब्येत सुधारल्यानंतर जान्हवीने पुन्हा सोशल मीडियावर एक हलकाफुलका व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

या व्हिडिओमध्ये Jahnavi Killekar आनंदी mood मध्ये चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. ती म्हणते – “मी एका फोटोला कॅप्शन दिलं होतं की नजर इज रिअल… आणि सगळ्यांनीच दुष्ट लागली म्हणायला सुरुवात केली. पण इतकं सगळ्यांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहेत… मग दुष्ट कोणी लावली?” असा प्रश्न ती मजेशीर पद्धतीने विचारते. तिच्या चेहऱ्यावरचा खेळकर भाव आणि बोलण्याची स्टाईल चाहत्यांना खूप भावली.

या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. काहींनी तर थेट छोटा पुढारी घनश्याम दरोडेचं नाव घेत मजामस्करी केली. एका युजरने लिहिलं – “आई शपथ, माझा काही संबंध नाही!” तर दुसऱ्याने CIDची आठवण करून देत कमेंट केली – “ACP प्रद्युमनला केस द्या, काहीतरी गडबड आहे दया!” अशा मजेदार प्रतिक्रिया पाहून जान्हवीचे चाहतेही आनंदात सामील झाले.

काही फॅन्सने मात्र तिला काळजी घेण्याचा सल्लाही दिला. “तुला दुष्ट नाही लागली ताई, लग्नातली धावपळ, थकवा आणि स्ट्रेसमुळे अशक्तपणा आला असेल. आराम कर,” अशी एक सहानुभूतीची कमेंटही आली.

हे पण वाचा.. जिवलगा नंतर पुन्हा एकत्र? अमृता खानविलकर आणि स्वप्नील जोशीच्या व्हिडीओवर चर्चा रंगली

Jahnavi Killekar सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असून तिचे व्हिडिओ आणि पोस्ट नेहमी चर्चेत राहतात. तिच्या नैसर्गिक बोलण्याच्या स्टाईलमुळे आणि विनोदी अंदाजामुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. या ताज्या व्हिडिओमुळे तिची हलकीफुलकी बाजू पुन्हा समोर आली असून चाहत्यांनीही नेहमीप्रमाणे सकारात्मक आणि मजेशीर प्रतिसाद दिला आहे.

आता पुढे जान्हवी कोणता नवा धमाल कंटेंट घेऊन येते, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

हे पण वाचा.. जयंत-जान्हवी समोरासमोर! ‘लक्ष्मी निवास’’ मालिकेत मोठा ट्विस्ट; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता

jahnavi killekar drusht question video