कंपन्यांच्या काटकसरीचा फटका ITSector नोकरभरतीला; AI,(टॅरिफ) कर किंवा सेवा खर्चात वाढ, युद्ध आणि अनिश्चिततेमुळे मोठी घसरण

ITSector

AI, टॅरिफ कर किंवा सेवा खर्चात वाढ युद्ध आणि जागतिक अनिश्चितता यांच्या कचाट्यात सापडलेला भारतीय ITSector सध्या ‘थांबा आणि पाहा’ मोडवर; भरतीत 20% घट आणि स्टार्टअप्सही सावध.

भारतीय सॉफ्टवेअर उद्योगावर आर्थिक अनिश्चिततेचे सावट अधिकच गडद होत चालले आहे. जवळपास 280 अब्ज डॉलरच्या या उद्योगाने सध्या नवीन नोकरभरती थांबवण्याचा निर्णय घेतला असून “थांबा आणि पाहा” अशी भूमिका अनेक ITSector कंपन्यांनी स्वीकारली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान, ITSector मधील नोकरभरती मागणीत जवळपास २० टक्क्यांनी घट झाली आहे.

नवीन टॅरिफ धोरणे, अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर यामुळे आयटी कंपन्यांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे कंपन्यांनी भरती धोरणे बदलली असून केवळ अत्यावश्यक पदांसाठीच भरती केली जात आहे. TeamLease Digital च्या आकडेवारीनुसार, आयटी सेवाक्षेत्रातील मागणी 80,000 वरून 55,000 पर्यंत घसरली आहे.

“ही केवळ चक्राकार मंदी नाही, ही मूलभूत उलथापालथ आहे”

Zoho चे सह-संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी अलीकडेच एक इशारा दिला आहे की भारतीय सॉफ्टवेअर उद्योग एका गंभीर स्थितीकडे वाटचाल करत आहे. त्यांच्या मते, ही घसरण केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे किंवा टॅरिफच्या अनिश्चिततेमुळे नाही, तर सॉफ्टवेअर उद्योगात दशकांपासून रुळलेल्या कार्यक्षमतेच्या अभावामुळे आहे. “आपण त्या कार्यक्षमतेच्या कमतरतेशी जुळवून घेतले आणि त्यावर रोजगार उभे केले. पण आता परिस्थिती बदलत आहे,” असे ते म्हणाले.

ITSector टॉप कंपन्याही काळजीपूर्वक पुढे सरकत आहेत

TCS, Infosys आणि Wipro या देशातील तीन प्रमुख ITSector कंपन्यांनी जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान थोडी भरती केली असली, तरी एकूण भरतीचा आलेख घसरलेलाच राहिला आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपन्यांनी मिळून 2,587 कर्मचाऱ्यांची कपात केली होती, तर सप्टेंबर तिमाहीत त्यांनी 15,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली होती. आता मात्र कंपन्या प्रचंड काळजीपूर्वक कर्मचाऱ्यांची निवड करत आहेत.

Wipro चे सीईओ श्रीनी पल्लिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कंपनीला जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हाच भरती केली जाईल. सध्या स्थिती पाहता, कोणाला भरती करून नंतर त्यांना प्रकल्पांवर काम देता येणार नसेल तर भरतीच न करणे योग्य आहे.”

हे पण वाचा ..Campa Cola चा बिहारमध्ये जलद विस्तार; बेगूसरायमध्ये १००० कोटींचा मोठा गुंतवणूक प्रकल्प

कॅम्पस भरतीही संयमित; AI आणि ऑटोमेशनचा प्रभाव स्पष्ट

TCS चे HR प्रमुख मिलिंद लक्कड म्हणाले, “कॅम्पस भरती मागील वर्षाच्या पातळीवरच असेल. मात्र नेट हेडकाउंट वाढेल की नाही हे बिझनेस वातावरणावर अवलंबून असेल.” दुसरीकडे, Wipro ने तीन वर्षांपूर्वी भरतीत घाई केल्याचा फटका बसल्याने यावेळी अत्यंत सावध धोरण राबवले आहे.

AI आणि ऑटोमेशनमुळे कंपन्या आता अधिक उत्पादकता केंद्रित धोरण स्वीकारत आहेत. Everest Group च्या युगल जोशी यांच्या मते, “सध्या मोठ्या प्रमाणात भरती होण्याऐवजी, स्थानिक कर्मचाऱ्यांमध्येच आवश्यक ते बदल करून काम सुरू ठेवण्यावर भर आहे.”

स्टार्टअप कंपन्यांनाही धक्का; सॉफ्टवेअर उत्पादन क्षेत्रात मागणी घटली

टेक स्टार्टअप्सनाही याचा फटका बसला असून त्यांनीही भरती थांबवली आहे. Xpheno च्या माहितीप्रमाणे, सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स क्षेत्रातील भरती मागणी 35,000 वरून 25,000 पर्यंत आली आहे. एकूण आयटी क्षेत्राचा “एक्टिव डिमांड”मध्ये वाटा 45 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

AI मुळे बदलतंय ITSector चं भविष्य

संपूर्ण ITSector AI, ऑटोमेशन आणि टॅरिफ युद्धामुळे केवळ तात्पुरत्या अडचणीत नाही, तर एका दीर्घकालीन बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. वेम्बू यांनी म्हटले आहे, “गेल्या 30 वर्षांची वाटचाल पुढील 30 वर्षांना मार्गदर्शक ठरणार नाही. ही खरी कसोटी आहे.”

EY च्या नितीन भट यांच्या मते, कंपन्या आता ‘ऍट्रिशन’ आणि ‘परफॉर्मन्स बेस्ट एक्झिट’ यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहेत. गरज असेल तेव्हाच lateral hiring केली जाते. त्यामुळे एकंदर भरती धोरणे अधिक काटकसरीची आणि गरजेनुसारच राबवली जात आहेत.

ग्रॅज्युएटसाठी संधी घटल्या

कॅम्पस प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातूनही ही स्थिती धोक्याची आहे. HfS Research चे प्रमुख फिल फर्स्ट यांनी म्हटले की, “आता पूर्वीसारखी मोठ्या प्रमाणावर भरती होणार नाही. 2025 वर्षभर ही स्थिती तशीच राहण्याची शक्यता आहे.”

Nasscom च्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातील ITSector ने 1.26 लाख लोकांची भरती केली, जे मागील वर्षीच्या तुलनेत फारशी वाढ नव्हे. उद्योगाला सध्या GCCs वर जास्त अवलंबून राहावे लागत आहे.

ITSector साठी नवीन युग सुरू

भारतीय ITSector एका संक्रमणकाळातून जात आहे. टॅरिफ युद्ध, AI, ऑटोमेशन आणि जागतिक अनिश्चिततेचा हा कलमशः फटका उद्योगाला बसतो आहे. येत्या काळात कंपन्यांना अधिक स्मार्ट, सुसंस्कृत आणि तंत्रज्ञानाभिमुख धोरण राबवावे लागेल. भरतीच्या पारंपरिक मॉडेलला आता नव्या युगाच्या निकषांनुसार नव्याने परिभाषित करावे लागणार आहे.

हे पण वाचा..HDFC Bank Q4 Results: एचडीएफसी बँकेचा तिमाही नफा १७,६१६ कोटींवर; शेअरहोल्डर्ससाठी २२ रुपयांचा लाभांश जाहीर<br>

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *